मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

UPI Payment वर लागणार लिमिट? GPay, PhonePe, Paytm साठी काय नियम

UPI Payment वर लागणार लिमिट? GPay, PhonePe, Paytm साठी काय नियम

आर्थिक व्यवहारांसाठी यूपीआय पेमेंट सिस्टीम वापरत आहात? मर्यादा घ्या जाणून...

आर्थिक व्यवहारांसाठी यूपीआय पेमेंट सिस्टीम वापरत आहात? मर्यादा घ्या जाणून...

आर्थिक व्यवहारांसाठी यूपीआय पेमेंट सिस्टीम वापरत आहात? मर्यादा घ्या जाणून...

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई: गेल्या काही वर्षांत ऑनलाइन पेमेंटचं प्रमाण वाढलं आहे. यूपीआय पेमेंट सिस्टीमने तर सर्वसामान्यांचं जीवन खूपच सोपं केलं आहे. स्मार्टफोनच्या एका टॅपवर कोणालाही सहज पैसे पाठवणं शक्य आहे. यासाठी डिजिटल वॉलेटचा उपयोग केला जातो.

पेटीएम, गुगल पे आणि फोन पे यांसारख्या विविध यूपीआय पेमेंट अ‍ॅप्सवर यूपीआय व्यवहारांची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. अलीकडे रस्त्यावरच्या भाजी विक्रेत्यापासून मॉलमधल्या फॅशनेबल ब्रँड्सच्या शोरूमपर्यंत सर्वत्र यूपीआयला सर्वत्र पसंती मिळते; पण पेटीएम, गुगल पे आणि फोन पे यांसारख्या विविध यूपीआय पेमेंट अ‍ॅप्सवर यूपीआय व्यवहाराची मर्यादा आहे. कोणत्या अ‍ॅपवरची मर्यादा काय आहे, हे आपण जाणून घेऊ.

दररोज एक लाख रुपयांपर्यंत व्यवहार

बँक टू बँक रिअल टाइम हस्तांतरण यूपीआय पेमेंट सिस्टिममध्ये होतं. त्यामुळे वेगवेगळ्या बँकांनी यासाठी वेगवेगळ्या दैनंदिन व्यवहार मर्यादा निश्चित केल्या आहेत. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या (NPCI) मार्गदर्शक तत्त्वांनुसार, यूपीआयवरून दररोज जास्तीत जास्त 1 लाख रुपयांपर्यंतचे व्यवहार करता येतात. काही लहान बँकांनी त्याची मर्यादा 25,000 रुपयांपर्यंत निश्चित केली आहे.

फोन पे, गुगल पेची मर्यादा काय?

फोन पे आणि गुगल पे ही अ‍ॅप्स यूपीआय पेमेंटसाठी लोकप्रिय आहेत. यावरची दैनंदिन व्यवहारांची मर्यादा 1 लाख रुपये आहे. गुगल पे एका दिवसात 10 व्यवहार करण्याची सुविधा देते, तर फोन पे वर ही व्यवहाराची मर्यादा बँकेनुसार 10 किंवा 20 पर्यंत असते. या दोन्ही अ‍ॅप्सवर एक खास गोष्ट म्हणजे, या अ‍ॅप्सवर एखाद्या व्यक्तीनं तुम्हाला 2,000 रुपयांपेक्षा जास्त रकमेची रिक्वेस्ट पाठवली, तर हे अ‍ॅप्स ती हॉल्ट करतात म्हणजेच थांबवतात.

पेटीएम अ‍ॅप लोकप्रिय

यूपीआय पेमेंटसाठी पेटीएम अ‍ॅप खूप लोकप्रिय आहे. या अ‍ॅपवर यूपीआय पेमेंटचं डेली ट्रान्सफर लिमिट 1 लाख रुपये आहे. तुम्ही या अ‍ॅपद्वारे एका दिवसात जास्तीत जास्त 20 यूपीआय व्यवहार करू शकता; पण पेटीएमवर यूपीआय पेमेंट लिमिट तासानुसार बदलतं. तुम्ही पेटीएमवर एका तासात 20,000 रुपयांपेक्षा जास्त रक्कम ट्रान्स्फर करू शकत नाही. तसंच, प्रत्येक तासाला तुम्ही या अ‍ॅपद्वारे जास्तीत जास्त 5 यूपीआय व्यवहार करू शकता.

अनेक जण गुगल पे, फोन पे, पेटीएम यांशिवाय इतर अ‍ॅप्सचाही वापर करून ऑनलाइन पेमेंट करतात. परंतु यूपीआयद्वारे केल्या जाणाऱ्या पेमेंट्ससाठी काही मर्यादा आहेत, हे सर्वांनीच लक्षात ठेवणं गरजेचं आहे.

First published:

Tags: Online payments