Home /News /news /

एअर इंडियात 49 टक्के तर सिंगल ब्रँडेड कंपन्यांमध्येही थेट FDI ला मंजुरी

एअर इंडियात 49 टक्के तर सिंगल ब्रँडेड कंपन्यांमध्येही थेट FDI ला मंजुरी

सातत्याने तोट्यात असलेल्या एअर इंडियाला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी 49टक्के एडीआयला केंद्र सरकारने अखेर मंजुरी दिलीय. तसंच ऑटोमॅटिक रूटच्या अंतर्गंतही बांधकाम क्षेत्रात तर 100 टक्के थेट परकीय गुंतवणुकीला मान्यता देण्यात आलीय.

पुढे वाचा ...
10 जानेवारी, नवी दिल्ली : सातत्याने तोट्यात असलेल्या एअर इंडियाला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी 49टक्के एडीआयला केंद्र सरकारने अखेर मंजुरी दिलीय. तसंच ऑटोमॅटिक रूटच्या अंतर्गंतही बांधकाम क्षेत्रात तर 100 टक्के थेट परकीय गुंतवणुकीला मान्यता देण्यात आलीय. या निर्णयामुळे सिंगल ब्रँन्डेड कंपन्यांना यापुढे केंद्रीय मंत्रिमंडळाच्या मंजुरीची गरज पडणार नाही. आजच्या या निर्णयाचा हवाई उड्डाण आणि बांधकाम क्षेत्राला थेट परकीय गुंतवणूक आकर्षित करून घेण्यासाठी आणि त्यामाध्यमातून रोजगार निर्मितीसाठी मोठा फायदा होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. खरंतर २०१४ सालीच सिंगल ब्रँड रिटेलमध्ये १०० टक्के गुंतवणुकीस परवानगी देण्यात आली होती. पण आता अॅटोमॅटीक रूटलाही मंजुरी मिळाल्यामुळे अनेक परदेशी कंपन्या भारतात गुंतवणुकीस उत्सुक होतील. त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला त्याचा फायदाच होईल. शिवाय नोकऱ्याही निर्माण होतील. दरम्यान, मल्टी ब्रँड रिटेलबाबत कोणतंही भाष्य करण्यात आलेलं नाही. कारण त्याला आधीच राजकीय पक्ष आणि व्यापारी संघटनांनी विरोध केलेला आहे. एअर इंडिया ही देशातील एकमेव सार्वजनिक हवाई प्रवासी वाहतूक कंपनी असून तिच्यावर ५२,००० कोटी रुपयांचे कर्ज आहे. एअर इंडियाच्या निर्गुंतवणुकीच्या प्रक्रियेला केंद्रीय मंत्रिमंडळाने जूनमध्ये मान्यता दिली होती. यानंतर आता केंद्र सरकारने एअर इंडियात परकीय गुंतवणुकीला मान्यता दिली आहे. एअर इंडियात परकीय गुंतवणुकीची मर्यादा ४९ टक्के असेल. एअर इंडियात परकीय गुंतवणुकीला मान्यता देण्यात आली असली तरी कंपनीची मालकी आणि नियंत्रण हे भारतीयांकडेच राहणार, असे स्पष्ट करण्यात आले. आत्तापर्यंत परदेशी विमान कंपन्यांना भारतातील विमान कंपन्यांमध्ये ४९ टक्क्यांपर्यंत गुंतवणूक करण्याची परवानगी होती. मात्र एअर इंडियाचा यात समावेश नव्हता. प्रचंड कर्जभार असलेल्या एअर इंडियाने आत्तापर्यंत तीन वेळा कर्ज उभारले आहे. डिसेंबरमध्ये १,५०० कोटी रुपये, सप्टेंबरमध्ये ३२५० कोटी तर ऑक्टोबरमध्ये १५०० कोटी रुपयांचे कर्ज उभारले होते.
First published:

पुढील बातम्या