जाहिरात
मराठी बातम्या / बातम्या / Gold Rate: सोन्या-चांदीचा वायदा भाव गडाडला, वाचा किती आहे किंमत

Gold Rate: सोन्या-चांदीचा वायदा भाव गडाडला, वाचा किती आहे किंमत

Gold Rate: सोन्या-चांदीचा वायदा भाव गडाडला, वाचा किती आहे किंमत

एमसीएक्सवर 5 मे 2020 रोजी चांदीचा वायदा शुक्रवारी 3.61 टक्क्यांनी किंवा 1439 रुपयांच्या जबरदस्त वाढीसह 41,311 रुपये प्रतिकिलोवर बंद झाला.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 04 एप्रिल : शुक्रवारी सोने-चांदीचा वायदा भाव हा मोठ्या पातळीवर बंद झाला. शुक्रवारी, एमसीएक्स एक्सचेंजमधील 5 जून 2020 रोजी सोन्याचे वायदे 1.11 टक्क्यांनी किंवा 480 रुपयांनी वाढून प्रति 10 ग्रॅम 43,720 रुपयांवर बंद झाले. त्याखेरीज 5 ऑगस्ट 2020 रोजी सोन्याचे वायदे शुक्रवारी 1.14 टक्के किंवा 495 रुपयांच्या वाढीसह वेगाने 10 ग्रॅम 43,860 रुपयांवर बंद झाले. सोन्यासह चांदीचे वायदेही शुक्रवारी उच्च पातळीवर बंद झाले. एमसीएक्सवर 5 मे 2020 रोजी चांदीचा वायदा शुक्रवारी 3.61 टक्क्यांनी किंवा 1439 रुपयांच्या जबरदस्त वाढीसह 41,311 रुपये प्रतिकिलोवर बंद झाला. आंतरराष्ट्रीय बाजाराबद्दल बोलताना शुक्रवारी सायंकाळी सोन्याच्या स्पॉट किंमतीत वाढ झाली. ब्लूमबर्गच्या म्हणण्यानुसार, शुक्रवारी संध्याकाळी जागतिक स्पॉट किंमत 0.24 टक्क्यांनी किंवा 3.95 डॉलरच्या वाढीसह 1,617.94 डॉलर प्रति औंस होती. त्याचबरोबर चांदीच्या जागतिक स्पॉट किंमतीत शुक्रवारी संध्याकाळी घट झाली आहे. शुक्रवारी चांदी 0.53 टक्क्यांनी किंवा 0.08 डॉलरच्या घटासह 14.41 डॉलर प्रति औंसवर व्यापार सुरू आहे. हे वाचा - पुणेकरांनो सुरक्षित राहा, अवघ्या 24 तासांत सापडले 14 नवे कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण जागतिक बाजारपेठेत सोन्या-चांदीशिवाय अन्य मौल्यवान धातूंबद्दल बोलताना पॅलेडियमची किंमतही शुक्रवारी संध्याकाळी 2148.51 डॉलर प्रति औंसच्या पातळीवर आली आणि प्लॅटिनमचे भाव प्रति औंस 722.57 डॉलरवर घसरले. कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी भारत सरकारने 25 मार्चपासून देशभरात 21 दिवसांचा देशव्यापी लॉकडाउन लागू केला आहे. या लॉकडाऊनमुळे देशातील आवश्यक असणारी वस्तू सेवा वगळता सर्व औद्योगिक व व्यवसायिक कामे ठप्प झाली आहेत. लॉक़डाऊनमुळे शुक्रवारी देशातील सोन्याचे स्पॉट मार्केट बंद राहिले. हे वाचा -  विदर्भात कोरोनाने घेतला 2 बळी, राज्यात मृतांची संख्या 21 वर

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात