मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /बाप रे! पाच दिवसांच्या बाळाला ब्रेन हॅमरेज, CT स्कॅन रिपोर्टनंतर डॉक्टरही धास्तावले

बाप रे! पाच दिवसांच्या बाळाला ब्रेन हॅमरेज, CT स्कॅन रिपोर्टनंतर डॉक्टरही धास्तावले

प्रतीकात्मक फोटो

प्रतीकात्मक फोटो

येथे 5 वर्षांच्या मुलाला ब्रेन हॅमरेजनंतर गुरुवारी रात्री रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं

पाटना, 8 जानेवारी : बिहारची (Bihar News) राजधानी पाटनाच्या इंदिरा गांधी आयुर्विज्ञान संस्थानमधून एक हैराण करणारी घटना समोर आली आहे. येथे 5 वर्षांच्या मुलाला ब्रेन हॅमरेजनंतर गुरुवारी रात्री रुग्णालयात दाखल करण्यात आलं. नवजात बाळाला ब्रेन हॅमरेजची माहिती दिल्यानंतर डॉक्टर आणि विशेषज्ञदेखील हैराण झाले आहेत. आयजीआयएमएसचे अधीक्षक डॉ. मनीष मंडलने सांगितलं की, हा दुर्मीळ प्रकार असून यावर रिचर्स करण्याची आवश्यकता व्यक्त करण्यात आली आहे.

IGIMS चे अधीक्षक म्हणाले...

पाटना IGIMS चे अधीक्षक डॉ मनीष मंडलने यांनी सांगितलं की, बाळाचा जन्म पूर्णियामध्ये झाला होता. जन्माच्या 12 तासानंतर तो जोरजोरात रडू लागला. त्याच्या पालकांनी बाळाला जवळील रुग्णालयात हलवलं. येथे बाळाचं सीटी स्कॅन आणि ब्लड टेस्ट करण्यात आलं.

डॉक्टरांनी सांगितले कशी आहे बाळाची तब्येत

या बाळाच्या आलेल्या सिटी स्कॅन रिपोर्टमुळे धक्का बसल्याचे डॉ. मंडल यांनी सांगितले, कारण या रिपोर्टमध्ये या बाळाच्या मेंदूत रक्त गोठल्याचे दिसत होते. या बाळाच्या ब्लड रिपोर्टमध्ये त्याच्या अंगात खूप कमी प्लेटलेट्स दिसत होते. या रिपोर्टनंतर तातडीने या  बाळाला आयसीयूत दाखल करण्यात आले, तसेच परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी या बाळाला औषधे देण्यात आली, तसेच त्याला काही प्ललेट्सही चढवण्यात आल्या.

वेगवेगळ्या विषयांचे तज्ज्ञ डॉक्टर्स करतायेत उपचार

या बाळावर उपचार करण्यासाठी, वेगवेगळ्या क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टरांची टीम तयार करण्यात आली आहे. जे सातत्याने या बाळाच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहेत. प्रसिद्ध बाल रोग तज्ज्ञ डॉ. निगम प्रकाश नारायण यांनी सांगितले की, हे असे अपवादात्मक परिस्थितीतच होते. काँग्युलेशन डिफेक्ट किवा एंजियोमॅटस विकृतीमुळे हे घडू शकते असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

First published:
top videos

    Tags: Baby died, Baby hospitalised, Health