Home /News /news /

सांगली : आधी प्रेम भंगाचं Reels, नंतर स्वत:च्या श्रद्धांजलीचा स्टेटस; सुशांतने संपवलं जीवन

सांगली : आधी प्रेम भंगाचं Reels, नंतर स्वत:च्या श्रद्धांजलीचा स्टेटस; सुशांतने संपवलं जीवन

सुशांतचा स्टेटस पाहून कुटुंबीयांना धक्काच बसला.

सांगली, 4 जून : आधी प्रेम विराहाचा व्हिडीओ नंतर स्वतःच्या श्रद्धांजलीचा फोटो मोबाइलला स्टेटस ठेवून सांगलीतील (Sangali News) एका तरुणाने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सुशांत भरत तोडके असं मृत तरुणाचं नाव असून वाळवा येथे एका शेतामध्ये असणाऱ्या गोठ्यात त्याने गळफास घेऊन ही आत्महत्या केली आहे. वाळवा येथील खेड रस्त्यावर असणाऱ्या एका शेतात सुशांत भरत तोडके (वय २६) रा. नागठाणे ता.पलूस हा शेतमजूर म्हणून काम करत होता. सोमवारी सकाळी सुशांतने तो काम करत असलेल्या शेतातील गोठ्यात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दरम्यान आत्महत्येपूर्वी सुशांत याने आपल्या मोबाईलवर व्हॉटसअॅप स्टेटसला प्रेम भंगचा व्हिडीओ रील ठेवला. जो कोणाला तरी उद्देशून होता. त्याच्या अर्ध्या तासानंतर त्याने स्वतःचा फोटो आणि खाली भावपूर्ण श्रद्धांजली असा मजुकर असणारा स्टेटस ठेवत काही वेळाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. सुशांत याचे व्हॉटसपचे स्टेट्स पाहिल्यानंतर कुटुंबीयांनी तातडीने तो भाड्याने राहता असलेल्या घर मालकाला फोन वरून सुशांतचा शोध घेण्यास सांगितले. त्यानंतर घर मालक इशान गावडे यांनी सुशांत ज्या शेतात काम करत होता त्याठिकाणी जाऊन पाहिले असता गोठ्यात सुशांत याचा मृतदेह लटकत असल्याचे समोर आले. सदर घटनेची नोंद आष्टा पोलीस ठाण्यात झाली असून पोलिसांकडून अधिक तपास केला जात आहे.
Published by:Meenal Gangurde
First published:

Tags: Crime news, Sangali

पुढील बातम्या