जाहिरात
मराठी बातम्या / बातम्या / अफगणिस्तानची राजनाधी काबुलमध्ये गोळीबार, हॉटेलमध्ये घुसून बंदुकधाऱ्यांनी केली फायरिंग

अफगणिस्तानची राजनाधी काबुलमध्ये गोळीबार, हॉटेलमध्ये घुसून बंदुकधाऱ्यांनी केली फायरिंग

अफगणिस्तानची राजनाधी काबुलमध्ये गोळीबार, हॉटेलमध्ये घुसून बंदुकधाऱ्यांनी केली फायरिंग

अफगाणिस्तानच्या काबूलमधून धक्कादायक माहिती समोर आली आहे.

  • -MIN READ International
  • Last Updated :

काबूल, 12 डिसेंबर : अफगाणिस्तानच्या काबूलमधून धक्कादायक माहिती समोर आली आहे. काबुलमधील हॉटेलमध्ये बंदूकधाऱ्यांनी घुसून फायरिंग केली आहे. चीनचे अनेक लोक यावेळी हॉटेलमध्ये होते. यावेळी अंधाधुंद गोळीबार करण्यात आला. अफगाणिस्तानच्या काबुलमध्ये सोमवारी दुपारी स्फोट झाला. शहरातील स्टार-ए-नाईन हॉटेलला हल्लेखोरांनी लक्ष्य केले. या हॉटेलला चायनीज हॉटेल असे म्हणतात, कारण चीनचे वरिष्ठ अधिकारी येथे वारंवार ये-जा करतात. आतापर्यंत, हल्लेखोरांची ओळख पटलेली नाही. मात्र, याठिकाणी कंपाऊंडमधून मोठ्याने बंदुकीच्या गोळ्या आणि स्फोट ऐकू येत आहेत, अशी माहिती मिळाली आहे. एएफपी या वृत्तसंस्थेने सांगितले की, अफगाणिस्तानच्या राजधानीत अनेकदा चिनी व्यापारी त्याच ठिकाणी येतात आणि जातात. काही दिवसांपूर्वी काबूलमधूनही हल्ल्याच्या बातम्या आल्या होत्या. यापूर्वी डिसेंबरच्या सुरुवातीला काबूलमधील पाकिस्तानी दूतावासावरही हल्ला झाला होता. त्या हल्ल्यात राजदूत उबेदुर रहमान निजमानी यांच्यावर गोळीबार करण्यात आला होता. मात्र, त्यावेळी तिथे उपस्थित असलेल्या सुरक्षा रक्षकाने स्वतः ती गोळी खाल्ल्याने त्यांचे प्राण वाचले. सध्या सुरक्षारक्षक जखमी असून त्याच्यावर उपचार सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी या हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे. त्यांच्या वतीने तालिबान सरकारला याप्रकरणी कठोर कारवाई करण्याचे आवाहन करण्यात आले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात