महालक्ष्मीच्या देखाव्‍यातून कोरोनायोद्धा डॉक्‍टरांबद्दल ठाकरे कुटुंबीयांनी अशी व्‍यक्‍त केली कृतज्ञता!

महालक्ष्मीच्या देखाव्‍यातून कोरोनायोद्धा डॉक्‍टरांबद्दल ठाकरे कुटुंबीयांनी अशी व्‍यक्‍त केली कृतज्ञता!

विशेष म्हणजे गौरी या डॉक्टरच्या रुपात साकारण्यात आल्या असून कोरोनापासून काळजी घेण्याचे आवाहन त्या करत आहेत

  • Share this:

बुलडाणा, 26 ऑगस्ट: गौराई अर्थातच महालक्ष्मीच्या आगमनाची आतुरता सागळ्यांनाच असते. जशी गणपतीच्या स्वागतास आतुरतात मनं अगदी त्याचप्रमाणे गौराईचं स्वागत करण्यासाठी महिलावर्गामध्ये कमालीचा उत्साह असतो. गौराईची अनेक रूपं मनात ठसतात. गौरी आवाहनाला गौरीचं घरोघरी होणारं आगमन गणेशोत्सवाचा आनंद द्विगुणित करणारा ठरतो. गौरीपूजनाच्या वेळी केली जाणारी गौरीची आरास, सजावट, भरला जाणारा ओवसा, गौरीचा नैवेद्य, खेळल्या जाणार्‍या फुगड्या व गाणी पाहता गौराईच्या स्वागताला सगळ्यांच्याच आनंदाचे भरते येते.

हेही वाचा...विद्यार्थ्यांनी अडवली अब्दुल सत्तारांची गाडी, अमानुष लाठीचार्जचा VIDEO समोर

काही ठिकाणी गौरीचे मुखवटे, तर काही ठिकाणी उभ्या स्वरूपात गौरी, तर काही बैठ्या स्वरूपात गौरीची आरास केलेली दिसून येते. यावेळी गौरीला दागदागिने, नवी साडी, मुकूट, नथ, केसांत फुलांची वेणी, पंचपक्वान्नांचा नैवेद्य दाखवला जातो. गणपतीच्या शेजारीच ही आरास केली जाते. मात्र यावेळी कोरोनाने संपूर्ण जगाला हैराण केले आहे. या काळात कोरोना योद्धा म्हणून जी मंडळी काम करीत आहे. अशा डॉक्टरांचा सन्मान करीत सामाजिक संदेश देणारे देखावे पाहण्यास मिळत आहेत. कोणी निसर्गाबद्दल आपले सामाजिक विचार मांडत आहे तर कोणी कोरोनापासून आपला बचाव कसा करावा व त्‍यासाठी कोणती दक्षता घ्यावी, यासाठी सामाजिक संदेश देत आहेत. असाच सामाजिक संदेश बुलडाणा जिल्ह्यातील येथील अनिकट रोड भागातील रहिवासी प्रवीण ठाकरे यांच्‍या कुटुंबीयांनी दिला आहे.

प्रवीण ठाकरे यांच्या घरी गौरी गणेशाचे आगमन झाले. त्यांच्या त्यांनी या वर्षी कोरोनामुळे समस्त मानव जातीवर उद्भवलेल्या संकटावर आधारीत गौरीची सजावट केली आहे. विशेष म्हणजे गौरी या डॉक्टरच्या रुपात साकारण्यात आल्या असून कोरोनापासून काळजी घेण्याचं आवाहन त्या करत आहेत, असा देखावा केला आहे. प्रत्येकाने आपली व आपल्या परिवाराची काळजी घ्यावी मास्क, सॅनिटायझर व सामाजिक अंतर ठेवून कोरोनापासून बचाव करावा हा उद्देश हा देखावा साकारण्यामागे असल्याचे भापकर सांगत आहेत. परिसरात सर्वत्र ठाकरे कुटुंबीयांनी साकारलेल्‍या या देखाव्‍याचे व कृतज्ञता व्‍यक्‍त करण्याच्‍या कल्‍पनेचे कौतुक होत आहे.

विशेष बाब म्‍हणजे येथे येणाऱ्या भाविकांना घरात प्रवेश घेण्यासाठी सॅनिटायझरने स्‍वच्‍छ हात धुवून घरात प्रवेश दिला जात असून प्रत्‍येकाला मास्‍कचे वाटप करण्यात येत चाहे विशेष म्‍हणजे डॉक्‍टर, पोलीस इतरही क्षेत्रात कार्यरत असलेले व कोरोना लढाईत महत्‍वाची भूमिका बजावत असलेल्‍या शहरातील कोरोना योध्यांचा ठाकरे कुटुंबीयांच्‍या वतीने सन्‍मान देखील करण्यात येणार आहे. दरवर्षी ज्‍येष्ठ गौरींचे पूजन होत आहे. परंतु यावर्षीची परिस्‍थिती वेगळी आहे.

हेही वाचा...कॅलक्युलेटरपेक्षा भारी याचा मेंदू; जगातील सर्वात वेगवान भारताचा Human calculator

कोरोनाच्‍या या काळात सामाजिक बांधिलकी जोपासत आपणही काही वेगळे करुन कोरोना महामारीबद्दल जनजागृतीपर संदेश द्यावा ही संकल्‍पना डोक्‍यात आली व शेवटी कुटुंबीयांशी चर्चा करुन आम्‍ही सर्वांना ज्‍या डॉक्‍टरांनी आपल्‍या जीवाची पर्वा न करता अहोरात्र परिश्रम घेतले, त्‍या डॉक्‍टरांबद्दल कृतज्ञता व्‍यक्‍त करण्याकरीता हा देखावा साकारला, असं ठाकरे यांनी सांगितले आहे.

Published by: Akshay Shitole
First published: August 26, 2020, 5:03 PM IST

ताज्या बातम्या