आपण लग्नसोहळ्यात गेलो किंवा एखाद्या कार्यक्रमात गेलो आणि तिथं जेवण असलं की मग सर्वात आधी स्वीट डिश काय आहे, याकडेच आपलं लक्ष असतं. अनेक जण आपल्या ताटात तर भरभरून स्वीड डिश घेतातच शिवाय जेवण संपल्यानंतरही पुन्हा स्वीट डिश घेऊन खातात.
असे समारंभ आणि कार्यक्रमच काय अनेकांना घरातदेखील जेवल्यानंतर गोड खाण्याची सवय असते. गोड हे जेवणानंतरच खावं असा जणू नियमच झाला आहे. मात्र आपण जेवणाच्या ताटातील गोड पदार्थ चुकीच्या वेळेला खात आहोत.
जेवणाच्या ताटातील गोड पदार्थ खायचा असेल तर जेवण्यापूर्वी अर्धा तास आधी खावं किंवा जेवताना खाल्ला तरी हरकत नाही, असं डॉक्टरांनी सांगितलं.
गोड पदार्थ पचायला जड असतं, ते जेवणाच्या आधी खाल्ले तर त्याचं पचन नीट होईल आणि जेवणाचं प्रमाणही मर्यादित राहिल.
आधी भरपेट जेवल्यानंतर तुम्ही गोड पदार्थ खाल्ले तर पोटाच्या समस्या उद्भवू शकतात. पोटासंबंधित विकार बळावू शकतात.