नवी दिल्ली, 14 नोव्हेंबर : संपूर्ण देशभरात आज दिवाळीचा (Diwali 2020) सण आनंदात साजरा केला जात आहे. दिवाळीनिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी देशातील नागरिकांनी शुभेच्छा दिल्या. भारतीय नेत्यांव्यतिरिक्त जगातील अनेक नेत्यांनीही दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. श्रीलंका, अमेरिकासह इनेत देशांच्या प्रमुखांनी भारताला दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. या शुभेच्छांमध्ये फ्रान्सचे राजदूत इमॅन्यूएल लॅनेन यांनी अनोख्या पद्धतीने भारतीयांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या, त्यांनी केला एका व्हिडीओ सध्या खूप चर्चेत आले. यानंतर मुंबई, कलकत्ता, पाँडिचेरी, चेन्नई आणि बंगळुरूमध्ये फ्रान्सच्या मिशन कार्यालयांच्या सदस्यांनी स्थानिक भाषांमध्ये दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. पाहा हा VIDEO…
We wish you all a very happy and prosperous Deepavali!
— French Embassy in India 🇫🇷🇪🇺 (@FranceinIndia) November 13, 2020
आप सभी को दीपावली की हार्दिक शुभकामनाएं|@FranceBombay @BangaloreFrance @FranceinKolkata @FranceinPondi pic.twitter.com/DBe8Y7ud7Z
चीनच्या राजदूतांनीही दिल्या शुभेच्छा… चीनच्या राजदूतांनी भारतातील लोकांना शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी आपल्या शुभेच्छांच्या संदेशात स्वस्थ आणि समृद्ध जीवनाच्या सदिच्छा दिल्या आहेत. भारतात चीनचे राजदूत सुन वेइदोंग यांनी ट्विटरवर शुभेच्छांच्या संदेशात लिहिलं आहे की, भारतातील मित्रांना दिवाळीच्या खूप शुभेच्छा…आनंद आणि उत्साहाच्या या सणासाठी मी तुम्हाला व तुमच्या कुटुंबीयांच्या चांगले स्वास्थ, सुख आणि समृद्धीची कामना करतो.