Home /News /news /

या नैसर्गिक गोष्टी मधुमेहावर आहेत रामबाण उपाय, रक्तातील साखर राहील नियंत्रणात

या नैसर्गिक गोष्टी मधुमेहावर आहेत रामबाण उपाय, रक्तातील साखर राहील नियंत्रणात

मधुमेहाचा (diabetes problem) त्रास होत असल्यास डॉक्टर औषधांव्यतिरिक्त नैसर्गिक अन्नपदार्थांद्वारेही रक्तातील साखर नियंत्रण ठेवण्याचं सुचवू शकतात. अशाच गोष्टींबद्दल जाणून घेऊया ज्या रक्तातील साखरेवर प्रभावीपणे नियंत्रण ठेवतात.

    नवी दिल्ली, 21 ऑक्टोबर : मधुमेह (diabetes) झाल्यानंतर रुग्णाला जीवनात इतर आजारांसोबतही संघर्ष करावा लागतो. मधुमेहामुळं हृदयरोग, स्ट्रोक, मूत्रपिंड रोग आणि अंधत्व यासारखे रोगही उद्भवू शकतात. यासाठी रक्तातील साखरेची (blood sugar level) पातळी नियंत्रणात ठेवणं फार महत्त्वाचं आहे. शरीर पुरेसे इन्सुलिन तयार करणं थांबवतं किंवा त्याचा प्रभावी वापर करू शकत नाही, तेव्हा लोकांना मधुमेह होतो. एखाद्या व्यक्तीला जास्त लघवी, थकवा, तहान, वारंवार भूक, अस्पष्ट दृष्टी झाली असेल किंवा जखम भरण्यास अधिक वेळ लागणं यासारखी लक्षणे दिसली तर त्यांनी त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधावा. मधुमेहाचा (diabetes problem) त्रास होत असल्यास डॉक्टर औषधांव्यतिरिक्त नैसर्गिक अन्नपदार्थांद्वारेही रक्तातील साखर नियंत्रण ठेवण्याचं सुचवू शकतात. अशाच गोष्टींबद्दल जाणून घेऊया ज्या रक्तातील साखरेवर प्रभावीपणे नियंत्रण ठेवतात. कडुनिंब - कडुनिंब ही एक बऱ्याच काळापासून वापरली जाणारी औषधी वनस्पती आहे. रक्तशुद्धीकरण, त्वचेचं आरोग्य, शरीरातील अपायकारक घटक काढून टाकण्यापासून ते निरोगी दातांसाठी कडुनिंब अत्यंत फायदेशीर आहे. कडुनिंबामध्ये ग्लायकोसाइड्स आणि ट्रायटरपेनोईड्स सारखे घटक आढळतात, जे रक्तातील ग्लुकोजचे प्रमाण नियंत्रित करू शकतात. आपण दिवसातून दोनदा पावडरच्या स्वरूपात त्याचे सेवन करू शकता. तसंच चहा, पाणी किंवा अन्नासहदेखील याचा लाभ घेता येईल. कारलं - कारलं ही मधुमेहावर प्रभावी ठरणारी भाजी आहे. त्यात असलेलं केराटीन आणि मोमोर्डिसिन मधुमेहामध्ये रक्तातील साखरेची पातळी वाढण्यास प्रतिबंध करते. दररोज सकाळी नियमितपणे याचं सेवन केल्यास लाभ होऊ शकतो. याचा रसही फायदेशीर आहे. मात्र, भाजी कच्ची खाणं याहून अधिक फायदेशीर आहे. याशिवाय, आवळा किंवा आपल्या आवडीच्या इतर कोणतीही भाजी घेऊन त्यात थोडी काळी मिरी किंवा मीठ घालूनही कारलं खाता येईल. हे वाचा - या देशात पुन्हा सुरू झाला Corona virus चा हाहाकार; दररोज 1000 हून अधिक रुग्णांचा मृत्यू, चिंताजनक स्थिती आलं - आल्याच्या फायदेशीर घटकांमुळं ते प्रत्येक घराच्या स्वयंपाकघरात आढळतंच. इन्सुलिन स्राव नियंत्रित करण्यासाठी हे खूप प्रभावी मानलं जातं. ते चहामध्ये वापरता येतं किंवा दुधात आलं-हळद मिसळूनही पिता येईल. मात्र, आले पूर्णपणे न शिजवता थोडं कच्चं राहिलं पाहिजे. आपण याची पावडर देखील वापरू शकता. जांभूळ - जांभूळ मधुमेहासाठी अत्यंत फायदेशीर आहे. त्यात असलेलं जांबोलिन साखर नियंत्रित करण्यास मदत करते. जाम्बुलिन जांभळाच्या बियांमध्ये सर्वाधिक असते. जांभूळ इन्सुलिन संवेदनशीलता वाढवून प्रतिबंधित मधुमेह वाढण्यास अटकाव करतं. जांभूळ शरीरातील अनियमितपणे वाढणारं ग्लुकोज नियंत्रित करतं. हे वाचा - परदेशी प्रवाशांना भारतात RT-PCR टेस्ट बंधनकारक, एक लस घेतलेल्यांना 7 दिवस विलगीकरण, वाचा सविस्तर मेथीचे दाणे - मेथीचं दाणे शरीरातील ग्लुकोजची पातळी सुधारण्यास मदत करतात. त्यात पाण्यात विरघळणारे फायबर आढळतात आणि ते कार्बोहायड्रेट्स शोषून आणि पाचन तंत्र मंद करतात. यामुळं रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहते. दालचिनी- दालचिनी घरात दररोज वापरल्या जाणाऱ्या मसाल्यांपैकी एक आहे. याच्यात अनेक औषधी गुणधर्म आहेत. याच्यामुळं इन्सुलिनचं कार्य सुधारलं जातं. याचा अर्थ शरीर इन्सुलिनचा प्रभावीपणे वापर करण्यास अधिक सक्षम बनतं. दिवसातून दोनदा 250 मिलीग्राम दालचिनी घेण्याची शिफारस तज्ज्ञ करतात. आपण जेवणापूर्वी त्याचं सेवन करू शकता.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Diabetes, Health Tips

    पुढील बातम्या