जाहिरात
मराठी बातम्या / बातम्या / रुग्णालयात उंदरानं कुरतडल्यामुळे नवजात बाळाचा दुर्दैवी मृत्यू!

रुग्णालयात उंदरानं कुरतडल्यामुळे नवजात बाळाचा दुर्दैवी मृत्यू!

रुग्णालयात उंदरानं कुरतडल्यामुळे नवजात बाळाचा दुर्दैवी मृत्यू!

बिहारमधील दरभंगा मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमधील हा संतापजनक प्रकार आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

    दरभंगा (बिहार), 31 ऑक्टोबर : उंदरानं कुरतडल्यामुळे एका नवजात बाळाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. बिहारमधील दरभंगा मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमधील हा संतापजनक प्रकार आहे. केवळ नऊ दिवसांचं हे बाळ मुलगी होती. हॉस्पिटल प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे नवजात मुलीचा मृत्यू झाला असल्याचा आरोप टुंबीयांकडून करण्यात येतोय. मात्र, हॉस्पिटल प्रशासनाकडून हे आरोप फेटाळून लावण्यात आले आहेत. नवजात मुलगी आजारी असल्यामुळे तिला ‘डीएमसीएच’मध्ये दाखल करण्यात आलं होतं. प्रकृती नाजुक असल्यामुळे तिला आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं होतं. दरम्यान, नऊ दिवसांच्या या चिमुरडीला उंदरानं कुरतडल्यामुळे तिचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. न्यूज18 शी बोलताना मृत पावलेल्या नवजात मुलीच्या वडिलांनी सांगितले की, सोमवारी रात्री 1 वाजेपर्यंत बाळाची प्रकृती पूर्णतः उत्तम होती. मात्र, मंगळवारी पहाटे 5 वाजताच्या सुमारास पाहण्यासाठी गेलो असता, तिचे हात आणि पाय उंदरानं कुरतडले असल्याचं आढळून आलं आणि तिचा मृत्यू झाला होता. नर्स आणि डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे बाळाचा मृत्यू झाला असल्याचा आरोप यावेळी त्यांनी केला. तर दुसरीकडे मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल प्रशासनाच्या वतीने बोलताना डॉ. ओमप्रकाश यांनी आरोप फेटाळून लावले आहेत. दरम्यान, जिल्हा प्रशासनाकडून याप्रकरणाची संपूर्ण चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. नक्षली हल्ला- पत्रकारासमोर उभा ठाकलेला मृत्यू, आईसाठी रेकॉर्ड केला भावूक VIDEO

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    Tags: rat bit
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात