जाहिरात
मराठी बातम्या / बातम्या / पंजाबच्या खेळाडूची इंग्लंडमध्ये वादळी खेळी, फक्त 10 बॉलमध्ये काढले 50 रन! VIDEO

पंजाबच्या खेळाडूची इंग्लंडमध्ये वादळी खेळी, फक्त 10 बॉलमध्ये काढले 50 रन! VIDEO

पंजाबच्या खेळाडूची इंग्लंडमध्ये वादळी खेळी, फक्त 10 बॉलमध्ये काढले 50 रन! VIDEO

आयपीएल स्पर्धेत पंजाब किंग्जकडून (Punjab Kings) कमाल करणाऱ्या लियाम लिव्हिंगस्टोनचा (Liam Livingstone) फॉर्म इंग्लंडमध्येही कायम आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 2 जून : आयपीएल स्पर्धेत पंजाब किंग्जकडून (Punjab Kings) कमाल करणाऱ्या लियाम लिव्हिंगस्टोनचा (Liam Livingstone) फॉर्म इंग्लंडमध्येही कायम आहे. इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या टी20 ब्लास्ट स्पर्धेत त्यानं आक्रमक अर्धशतक झळकावलं आहे. लिव्हिंगस्टोनच्या या खेळीमुळे त्याच्या लँकशर टीमनं डर्बीशर विरूद्ध (Lancashire-vs-Derbyshire) 17 रननं  विजय मिळवला. लँकशरनं पहिल्यांदा बॅटींग करत निर्धारित 20 ओव्हरमध्ये 6 आऊट 219 रन केले. 220 रनचं आव्हान पार करण्यासाठी डर्बीशरनं जोरदार प्रयत्न केला, पण त्यांचे प्रयत्न यशस्वी झाले नाहीत. या मॅचमध्ये लिव्हिंगस्टोननं 40 बॉलमध्ये 75 रनची खेळी केली. यावेळी त्यानं 5 फोर आणि 5 सिक्स लगावले. याचाच अर्थ त्यानं फक्त 10 बॉलमध्ये त्याचं अर्धशतक झळकावलं. लिव्हिंगस्टोननं त्याचं अर्धशतक 4 फोर आणि 4 सिक्सच्या मदतीनं पूर्ण केले.

जाहिरात

लिव्हिंगस्टोन या आयपीएलमध्ये पंजाब किंग्जकडून खेळला. पंजाबची टीम ‘प्ले ऑफ’ मध्ये प्रवेश करू शकली नाही. त्यानं आयपीएलमध्ये सिक्सर्सचा पाऊस पाडला आहे. लिव्हिंगस्टोननं या सिझनमध्ये 34 सिक्स लगावले असून त्यामध्ये सर्वात लांब 117 मीटर सिक्सचा समावेश आहे. Deepak Chahar प्रेमाच्या शहरात अडकला विवाह बंधनात, पाहा लग्नाचे Photo टी20 ब्लास्टमध्ये लिव्हिंगस्टोनचा ऑल राऊंड़ खेळ पाहयला मिळतोय. त्यानं नॉटिंघमशर विरूद्धच्या पहिल्या मॅचमध्ये 30 रन आणि 3 विकेट्स अशी कामगिरी केली होती. त्यानंतर आता डर्बीशर विरूद्धच्या मॅचमध्ये 75 रनची आक्रमक खेळी केलीच त्याचबरोबर 1 विकेटही घेतली. टी20 वर्ल्ड कपच्या पार्श्वभूमीवर त्याचा हा फॉर्म इंग्लंडसाठी महत्त्वाचा आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात