मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

T10 League: धोनीच्या सहकाऱ्याचा कहर, 2 ओव्हर्समध्ये घेतल्या 4 विकेट्स

T10 League: धोनीच्या सहकाऱ्याचा कहर, 2 ओव्हर्समध्ये घेतल्या 4 विकेट्स

यूएईमध्ये सुरू असलेल्या टी10 लीगमध्ये (T10 Leauge) . पण महेंद्रसिंह धोनीच्या (MS Dhoni) चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) टीमकडून खेळणाऱ्या तरुण बॉलरनं या स्पर्धेत फक्त 2 ओव्हर्समध्ये 4 विकेट्स घेतल्या आहेत.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 29 नोव्हेंबर: यूएईमध्ये सुरू असलेल्या टी10 लीगमध्ये (T10 Leauge) बॅटर्स नवे-नवे विक्रम रचत आहेत. आक्रमक बॅटींगचं उदाहरण प्रत्येक मॅचमध्ये पाहयला मिळत असून त्यामुळे कोणतंही टार्गेट सेफ नाही. बॉलर्सची होणारी जोरदार धुलाई ही या स्पर्धेतील नेहमीची गोष्ट आहे. पण महेंद्रसिंह धोनीच्या (MS Dhoni) चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) टीमकडून खेळणाऱ्या तरुण बॉलरनं एका मॅचमध्ये तरी ही परंपरा मोडली आहे. त्यानं 2 ओव्हर्समध्ये 9 रन देत तब्बल 4 विकेट्स घेतल्या आहेत.

चेन्नईचा फास्ट बॉलर डोमिनिक ड्रेक्स (Dominic Drakes) याने ही जोरदार कामगिरी केली आहे. टी10 लीगमध्ये दिल्ली बुल्स (Delhi Bulls) या टीमचा ड्रेक्स सदस्य आहे. त्यानं बांगला टायगर्स (Bengla Tigers)  टीम विरुद्ध 4 विकेट्स घेतल्या. त्याच्या या प्रभावी स्पेलमुळे दिल्लीला विजय मिळला.  या मॅचमध्ये दिल्लीनं पहिल्यांदा बॅटींग करत निर्धारित 10 ओव्हर्समध्ये 7 आऊट 100 रन केले. बुल्सकडून इयन मॉर्गननं (Eoin Morgan) सर्वात जास्त 35 रन काढले.  बांगला टायगर्स याला उत्तर देताना 10 ओव्हर्समध्ये 9 आऊट 88 रनच करू शकली. या विजयामुळे दिल्ली कॅपिटल्सचे 8 मॅचमध्ये 10 पॉईंट्स झाले असून ते आता पॉईंट टेबलमध्ये चौथ्या क्रमांकावर आहेत.

दिल्लीचा कॅप्टन ड्वेन ब्राव्होनं (Dwayae Bravo) या विजयाचा पाया रचला. त्याने बांगला टायगर्सच्या दुसऱ्याच ओव्हरमध्ये 2 झटपट विकेट्स घेतल्या. त्यानंतर आदिल रशिदनंही एका ओव्हरमध्ये 2 विकेट्स घेत टायगर्सना अडणीत आले. त्यानंतर ड्रेक्सनं 2 ओव्हरमध्ये 4 विकेट्स घेत टायगर्सचा परतीचा मार्ग बंद केला. टायगर्सकडून कॅप्टन फाफ ड्यू प्लेसिसनं (Faf Du Plesis) फोर आणि 1 सिक्स लगावत आशा निर्माण केल्या होत्या. त्याला ड्रेक्सनं आऊट केलं. ड्यू प्लेसिसनं 16 बॉलमध्ये 26 रन काढले.

टीम इंडियाचा फास्ट बॉलर शार्दुल ठाकूरचा झाला साखरपुडा, पाहा VIDEO

यापूर्वी दिल्लीनं पहिल्यांदा बॅटींग केली. त्यांच्या विकेट्स ठराविक अंतरानं पडत असताना मॉर्गननं एक बाजू लावून धरली होती. त्याच्या 35 रनच्या खेळीमुळेच दिल्लीला 100 रनचा टप्पा गाठला.

First published:

Tags: Cricket, Csk, MS Dhoni