सरावादरम्यान ‘आजी’सोबत दिसला धोनी, आजीने सांगितलं कोण आहे क्रिकेटचा 'डॉन'

सरावादरम्यान ‘आजी’सोबत दिसला धोनी, आजीने सांगितलं कोण आहे क्रिकेटचा 'डॉन'

एम.एस. धोनीकडून भलेही त्याच्या नावाला साजेशी कामगिरी होत नाही, पण त्याच्या चाहत्यांची संख्या कमी न होता उत्तरोत्तर वाढतच चालली आहे.

  • Share this:

सिडनी, १५ जानेवारी- एम.एस. धोनीकडून भलेही त्याच्या नावाला साजेशी कामगिरी होत नाही, पण त्याच्या चाहत्यांची संख्या कमी न होता उत्तरोत्तर वाढतच चालली आहे. धोनीसाठी वेडे असणाऱ्यांपैकी एक तर सिडनीमध्येच भेटली. ८७ वर्षांच्या एक आजी फक्त धोनीला भेटण्यासाठी मैदानात आल्या होत्या. धोनीला जेव्हा ही गोष्ट कळली तेव्हा त्याने सरावानंतर त्या आजींना भेटायला गेला आणि त्यांच्यासोबत थोडा वेळ घालवला. दोघांच्या भेटीचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. धोनीच्या चाहत्यांना हा व्हिडिओ फारच आवडला आहे.

धोनी त्या आजींसोबत खूप वेळ बोलत राहीला. या भेटीनंतर आजींनी धोनीचं भरभरुन कौतुक केलं. यावेळी आजींनी त्या धोनीच्या किती मोठ्या चाहत्या आहेत हेही सांगितलं. आजी म्हणाल्या की, ‘मी फार नशीबवान आहे की मी धोनीला भेटले. मला त्याचा अभिमान आहे आणि मला त्याला भेटून फार आनंद झाला.’ आजी त्यांच्या मुलासोबत धोनीला भेटायला आल्या होत्या. त्यांचा मुलगा म्हणाला की, ‘माझ्या आईसाठी हा अविस्मरणीय क्षण आहे. धोनी आजच्या क्रिकेटमधील डॉन ब्रॅडमॅन आहे.’

सिडनी येथील पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला होता. रोहित शर्माने सामन्यात शतकी खेळी खेळली होती तर धोनीने अर्धशतक झळकावलं होतं. मात्र दोघांचीही कामगिरी व्यर्थ गेली. धोनीने फार संथगतीने अर्धशतक ठोकल्यामुळे सोशल मीडियावर तो मोठ्या प्रमाणात ट्रोल झाला होता. सध्या भारतीय संघ एकदिवसीय मालिकेत ०-१ ने पिछाडीवर आहे. त्यामुळे तीन सामन्यांच्या मालिकेत स्वतःचं अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी भारताला दुसरा सामना जिंकावाच लागणार आहे.

VIDEO : एका चेंडूत हव्या होत्या 6 धावा, तरीही 1 चेंडू राखून जिंकला सामना

First published: January 15, 2019, 10:44 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading