मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /'भारतामध्ये असुरक्षित वाटतं' या दाव्यावर ऑस्ट्रेलियन खेळाडूचं 24 तासात घूमजाव!

'भारतामध्ये असुरक्षित वाटतं' या दाव्यावर ऑस्ट्रेलियन खेळाडूचं 24 तासात घूमजाव!

आयपीएलच्या बायो-बबलमधून बाहेर पडताच झम्पानं (Adam Zampa) भारतामधील परिस्थितीवर जोरदार टीका केली होती. तसंच बायो-बबलमध्ये असुरक्षित वाटत असल्याचं मत व्यक्त केलं होतं.

आयपीएलच्या बायो-बबलमधून बाहेर पडताच झम्पानं (Adam Zampa) भारतामधील परिस्थितीवर जोरदार टीका केली होती. तसंच बायो-बबलमध्ये असुरक्षित वाटत असल्याचं मत व्यक्त केलं होतं.

आयपीएलच्या बायो-बबलमधून बाहेर पडताच झम्पानं (Adam Zampa) भारतामधील परिस्थितीवर जोरदार टीका केली होती. तसंच बायो-बबलमध्ये असुरक्षित वाटत असल्याचं मत व्यक्त केलं होतं.

मुंबई, 29 एप्रिल : देशात वाढलेल्या कोरोना व्हायरसचा परिणाम आयपीएल (IPL 2021) स्पर्धेवर देखील झाला आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या (RCB) केन रिचर्डसन (Kane Richardson) आणि अ‍ॅडम झम्पा (Adam Zampa) यांनी भारतातल्या कोरोना संकटामुळे आयपीएलमधून माघार घेतली. आयपीएलच्या बायो-बबलमधून बाहेर पडताच झम्पानं भारतामधील परिस्थितीवर जोरदार टीका केली होती. तसंच बायो-बबलमध्ये असुरक्षित वाटत असल्याचं मत व्यक्त केलं होतं. आता ऑस्ट्रेलियात परतल्यानंतर अवघ्या 24 तासांमध्ये झम्पानं या वक्तव्यावरुन घूमजाव केलं आहे.

झम्पानं ऑस्ट्रेलियात पोहचताच दिलेल्या पहिल्या प्रतिक्रियेत म्हंटलं आहे की,"आमच्या बद्दल काळजी करणाऱ्या सर्वांचे धन्यवाद. मी आणि केन मेलबोर्नमध्ये सुरक्षित परतलो. आयपीएलमधील बायो-बबलमध्ये  असुरक्षित वाटत होतं या माझ्या वक्तव्याचं बायो-बबलमध्ये व्हायरस येईल या वक्तव्याशी काहीही संबंध नव्हता. बीसीसीआय आणि आरसीबीनं आम्हाला सुरक्षित वाटावं म्हणून संपूर्ण काळजी घेतली. आयपीएल स्पर्धा योग्य व्यक्तींच्या हाती असून ती नक्की पूर्ण होईल. या स्पर्धेतून मााघार घेणे हा आमचा वैयक्तिक निर्णय होता."

24 तासांपूर्वी केली होती टीका

झम्पानं 'सिडनी मार्निंग हेरॉल्ड' या ऑस्ट्रेलियन वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये भारतामधील वातावरणावर टीका केली आहे. "मला युएईमध्ये अधिक सुरक्षित वाटत होतं. तिथं मागच्या वर्षी ही स्पर्धा झाली होती.  आम्ही आजवर सुरक्षित बायो-बबलमध्ये राहिलो आहोत. माझ्या मते हे सर्वात असुरक्षित बायो-बबल होते. आम्हाला इथं अनेकदा स्वच्छतेबद्दल सांगितलं जायचं. तसेच अतिरिक्त सावधगिरी बाळगावी लागत होती. मला इथं सर्वाात जास्त असुरक्षित वाटलं." असं मत त्यानं व्यक्त केलं होतं.

IPL 2021: विराट कोहलीला मदत करण्यास RCB च्या खेळाडूचा नकार, हे आहे कारण

झम्पा फक्त आयपीएल स्पर्धेवर बोलून थांबला नाही. भारतामध्येच ऑक्टोबर महिन्यात टी20 वर्ल्ड कप होणार आहे. झम्पानं या मुलाखतीमध्ये तो मुद्दा देखील उपस्थित केला आहे. "आयपीएल स्पर्धा सहा महिन्यांपूर्वी दुबईमध्ये झाली. आम्हाला तिथं असं अजिबात वाटलं नाही. माझ्यामध्ये आयपीएलसाठी तो पर्याय उत्तम होता. अर्थात याच्याशी अनेक राजकीय मुद्दे निगडित आहे. भारतामध्येच यावर्षी टी20 वर्ल्ड कप होणार आहे. क्रिकेट विश्वात बहुधा आगामी काळात याच विषयावर चर्चा होईल." असा दावाही झम्पानं केला होता.

First published:

Tags: Coronavirus, IPL 2021, RCB