Home /News /news /

IND vs ENG : इशानच्या जबरदस्त पदार्पणामुळे सिनिअर खेळाडूची जागा धोक्यात!

IND vs ENG : इशानच्या जबरदस्त पदार्पणामुळे सिनिअर खेळाडूची जागा धोक्यात!

शिखर धवनच्या (Shikhar Dhawan) जागेवर टीममध्ये समावेश झालेल्या इशान किशनने फक्त 32 बॉलमध्ये पाच फोर आणि चार सिक्सच्या मदतीनं 56 रन काढले.

    अहमदाबाद, 15 मार्च : कॅप्टन विराट कोहली (Virat Kohli)  आणि पहिलीच मॅच खेळणारा इशान किशन (Ishan Kishan) यांच्या अर्धशतकामुळे भारतानं टी20 मालिकेत जोरदार पुनरागमन केलं आहे. भारताने दुसऱ्या मॅचमध्ये इंग्लंडचा 7 विकेटने पराभव करत पाच मॅचच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी केली आहे. शिखर धवनच्या (Shikhar Dhawan) जागेवर टीममध्ये समावेश झालेल्या इशान किशनने फक्त 32 बॉलमध्ये पाच फोर आणि चार सिक्सच्या मदतीनं 56 रन काढले. त्याने विराट कोहलीसोबत दुसऱ्या विकेटसाठी 94 रनची भागिदारी  केली. ही भागिदारी भारताच्या विजयामध्ये निर्णयाक ठरली. पदार्पणातील जबरस्त खेळाबद्दल इशानला 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कारानं गौरवण्यात आलं. भारतीय टीमनं या मॅचमध्ये प्रयोग करत शिखर धवनच्या जागी इशानला संधी दिली. शिखरला पहिल्या मॅचमध्ये खास कामगिरी करता आली नव्हती. तो 12 बॉलमध्ये फक्त 4 रन काढून आऊट झाला. विराटने या मालिकेच्या पूर्वी रोहित शर्मा आणि केएल राहुल हे पहिल्या पसंतीचे सलामीवीर आहेत, असं सांगितले होतं. रोहितला विश्रांती दिल्यानेच धवनला पहिल्या मॅचमध्ये संधी मिळाली. मात्र त्यामध्ये तो अपयशी ठरल्यानं त्याला टीमममधून वगळण्यात आलं. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळणारा इशान किशन सध्या फक्त 22 वर्षांचा आहे. भारतीय टीममध्ये तो शिखरच्या ऐवजी सलामीचा दावेदार बनू शकतो. इशान देखील धवन प्रमाणे डाव्या हाताने बॅटींग करतो. मोठे फटके लगावण्याची त्याच्यामध्ये क्षमता आहे. त्याने मागच्या आयपीएल सिझनमध्ये (IPL 2020) 14 मॅचमध्ये 516 रन केले होते. यामध्ये चार अर्धशतकांचाही समावेश होता. मुंबई इंडियन्सला पाचव्यांदा अजिंक्यपद मिळवून देण्यात इशानचं मोलाचं योगदान होतं. आयपीएलमधील त्याच्या फॉर्ममुळेच त्याची टीम इंडियात निवड झाली. भारताच्या टॉप ऑर्डरमध्ये डावखुऱ्या बॅट्समनची कमतरता आहे. ही कमतरता इशान भविष्यामध्ये भरुन काढू शकतो. ( वाचा : मोठ्या मनाचा इशान किशन! हे वाचून तुम्हीही कराल कौतुक ) इशानच्या या साऱ्या विशेष गोष्टींचा थेट परिणाम हा शिखर धवनवर होणार आहे. त्यामुळे त्याची भारतीय टीममधील आधीच डळमळीत असलेली जागा आता धोक्यात आली आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Career in danger, Cricket, India vs england, IPL 2021, Ishan kishan, Shikhar dhavan, Sports

    पुढील बातम्या