यांचं काय करायचं? पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे!

पुण्यात मात्र, चक्क रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येच कंत्राटदाराने पैसे खाल्ल्याचा गंभीर आरोप झालाय.

News18 Lokmat | Updated On: Nov 16, 2018 09:51 PM IST

यांचं काय करायचं? पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे!

वैभव सोनवणे, पुणे, ता.16 नोव्हेंबर : रस्ता बांधकामात भ्रष्टाचार झाल्याच्या घटना काही नव्या नाहीत. पुण्यात मात्र, चक्क रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येच कंत्राटदाराने पैसे खाल्ल्याचा गंभीर आरोप झालाय. पुण्यातल्या नदी पात्रात मनपानेच बांधलेल्या बेकायदा रस्त्याचा वाद आता खूप जुना झालाय. पर्यावरणवाद्यांनी हा मुद्दा हरित लवादापासून ते थेट सर्वोच्च न्यायालयापर्यंत नेल्यानंतर अखेर हा रस्ता उखडून टाकण्याचे आदेश निघाले होते. त्यानंतर मग मनपाने रस्ता तोडण्याचे टेंडरही काढले मात्र त्यातही भ्रष्टाचार झाल्याची माहिती पुढं आलीय.


विठ्ठलवाडी ते वारजे असा साधारण 24 मीटरचा रस्ता होता. अगदी गुगल मॅपवर ही रस्ता तेवढाच दिसतोय पण पालिकेने रस्ता उखडण्यासाठी टेंडर काढले ते 30 मीटरचं आणि प्रत्यक्षात कंत्राटदाराला बील चुकतं केलं ते तब्बल 54 मीटरचं...! माहिती अधिकारात हा सगळा गैरप्रकार समोर आलाय.


  • पुण्यात चक्क रस्ता उखडण्यातही भ्रष्टाचार ?

  • Loading...

  • 24 मीटरचा रस्ता उखडण्यासाठी 30 मीटरचं कंत्राट !

  • कंत्राटदाराला 54 मीटरच्या बिलाचे पैसे कोणी चुकते केले

  • नदी पात्रातला रस्ता उखडण्यातही पैसे कोणी खाल्ले


पुणे मनपा बांधकाम विभागाचे अधिकारी मात्र या गैरप्रकारावर मूग गिळून गप्प बसलेत, त्यामुळे ज्या कोणी अधिकाऱ्याने या कंत्राटदाराची बीलं मंजूर केली त्याच्यावर काय कारवाई होणार आणि कंत्राटदाराला चुकते केलेले अतिरिक्त बीलाचे पैसे नेमकं कोण आणि कशी वसूल करणार ? असा सवाल पुणे सजग नागरिक मंचाने उपस्थित केलाय.


 


 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 16, 2018 09:51 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...