नवी दिल्ली, 13 एप्रिल : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सूचनेनंतर केंद्रीय मंत्री व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कार्यालयात काम सुरू केले आहे. पंतप्रधान मोदींच्या सूचनेनंतर केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, किरेन रिजिजू, अर्जुन मुंडा यांच्यासह अनेक मंत्री कार्यालयात पोहोचले आहेत. त्यांनी आजपासून आपल्या कामाला सुरुवात केली असून यावेळी आरोग्याची आणि सुरक्षेची काळजी घेण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियाच्या कार्यालयात पोहोचलेले केंद्रीय क्रीडामंत्री किरेन रिजिजू म्हणाले की, आज केवळ वरिष्ठ अधिकारी आणि किमान आवश्यक कर्मचारी कार्यालयात येतील. आम्ही कोविड -19 संदर्भातील सर्व मार्गदर्शक सूचनांचे अनुसरण करू. त्याचबरोबर अधिकाऱ्यांनी दिल्लीतील शास्त्री भवन गाठणं सुरू केलं आहे. अधिकाऱ्यांच्या शरीर तापमानाचा तपास केला जात असून त्यांच्या वाहनांचीही स्वच्छता केली जात आहे. गिरीराज सिंह यांनीही गाठले कार्यालय केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी ट्वीट केले की “आज मी मंत्रालयाच्या कार्यालयात पोचलो आहे. कोरोनाशी लढा देण्याच्या सूचनेनुसार मी सतत माझ्या कार्यालयात येत आहे. तुम्हा सर्वांना सामाजिक अंतर ठेवणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे सुचनांचं अनुसरण करा आणि घरी रहा … निरोगी रहा. "
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी केंद्रीय अधिकाऱ्यांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांना कार्यालयातूनच काम करण्याचे निर्देश दिले. लॉकडाऊनमुळे बहुतेक मंत्री व उच्च अधिकारी घराबाहेर काम करत होते. पीएमओच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पीएम मोदी यांनी मंत्रीपरिषदेच्या सर्व सदस्यांना सामाजिक अंतर राखून सोमवारपासून मंत्रालयात काम करण्यास सांगितले.
Delhi: Officials arriving at Shastri Bhawan being screened with a temperature gun and vehicles being sanitised, amid COVID19 disease threat pic.twitter.com/VdRfJRQeOa
— ANI (@ANI) April 13, 2020
सध्या मंत्रालयात काम करण्यासाठी फक्त सहसचिव स्तरावरील अधिकाऱ्यांलाच बोलावण्यात आले आहे. या स्तराखालील अधिकारी व कर्मचार्यांना गरजेनुसार बोलावण्यात येईल. त्यांना सोशल डिस्टंसिंग राखून काम करण्याच्या सुचना दिल्या आहेत. तर वारंवार हात धूणे, शौचालयात स्वच्छता राखणे आणि आपली काळजी घेणे अशा सूचना देण्यात आल्या आहेत. संपादन - रेणुका धायबर

)








