#21Days : घरात बसून बोर झाला आहात? इंग्रजी शिकण्यासाठी सर्वात सोपा उपाय

#21Days : घरात बसून बोर झाला आहात? इंग्रजी शिकण्यासाठी सर्वात सोपा उपाय

हा विषय आपण या 21 दिवसांमध्ये शिकू शकता. त्या विषयाची भीती घालवू शकता. यासाठी आम्ही तुम्हाला मदत करणार आहोत काही सोप्या ट्रीक्स सांगून.

  • Share this:

मुंबई, 27 मार्च : देशात कोरोनाचं थैमान सुरू आहे. त्यामुळे मोदी सरकारनं लॉकडाऊनची घोषणा केली आहे. संपूर्ण देशात लॉकडाऊनमुळे सर्वजण 21 दिवस घरी राहणार आहेत. 15 एप्रिलपर्यंत हे लॉकडाऊन असल्यानं घरी राहून एवढे दिवस काय करायचं असा प्रश्न पडतो. मात्र चिंता करू नका. या 21 दिवसांचा तसं म्हटलं तर योग्य वापर आपण करू शकता. ही तुम्हाला मिळालेली एक संधी आहे असं समजा. या दिवसांमध्ये ज्यांचं इंग्रजी भाषेवरील प्रभुत्व कमी आहे. किंवा ज्यांना भीती आहे तो विषय़ म्हणजे इंग्रजी. हा विषय आपण या 21 दिवसांमध्ये शिकू शकता. त्या विषयाची भीती घालवू शकता. यासाठी आम्ही तुम्हाला मदत करणार आहोत काही सोप्या ट्रीक्स सांगून.

इंग्रजीमध्ये चॅटिंग करा

आपण सोशल मीडियावर दिवसातला बराच वेळ घालवत असतो. त्यातही आपल्या काही खास मित्रांना भेटता येत नाही अशावेळी मेसेजवर किंवा व्हॉट्सअॅपवर संवाद साधला जातो. त्यावेळी तो इंग्रजीतून करण्याचा प्रयत्न करा. आपल्या कीबोर्डवरील स्पेलिंग ऑटो करेक्शन सुरू ठेवा त्यामुळे आपल्या स्पेलिंगमधील चुका समजतील. सुरुवातील चुकेल, शब्द सुचणार नाहीत पण प्रयत्न करा.

इंग्रजीमध्ये पोस्ट लिहिण्यावर भर द्या.

सोशल मीडियावर पोस्ट करताना शक्यतो इंग्रजीमध्ये पोस्ट करण्याचा प्रयत्न करा. सर्वात जास्त इंग्रजी वाचण्याचा सोशल मीडियावर प्रयत्न करा. जे शब्द अडतात त्याचे अर्थ शोधा.

पुस्तकं वाचा

सोप्या भाषेतील कॉमिक्स, किंवा कथांची इंग्रजीतील पुस्तक वाचा. रोज 50 पानं वाचून व्हायला हवीत हे टार्गेट ठेवा. त्यात आलेले नवीन शब्द लक्षात ठेवा त्याचा अर्थ शोधा आणि रोज ते आपल्या रुटीनमध्ये वापरण्याचा प्रयत्न करा.

वेब सिरिज आणि सिनेमा पाहा

इंग्रजी कार्टून, वेब सिरीज, व्हिडीओ, सिनेमे पाहा, शक्य असेल तर सबटायटल इंग्रजी असलेले वाचण्याचा मोठ्यानं प्रयत्न करा. त्यामुळे आपल्या कानावर इंग्रजी शब्द पडतील आणि वाचनामुळे उच्चार सुधारतील. नवीन शब्द डोक्यात ठेवा आणि त्याला पर्यायी शब्द शोधण्याचा प्रयत्न करा.

ट्रान्सलेशन

हिंदी किंवा मराठी वृत्तपत्र किंवा एखाद्या पुस्तकाचा उतारा ट्रान्सलेट करा. आपणास इंग्रजी शिकायचे असेल तर संकोच अजिबात सोडा. इंग्रजी वर्तमानपत्रे आणि पुस्तके वाचा आणि सर्वात महत्वाचे इंग्रजी चित्रपट, बातम्या आणि गाणी ऐका. याद्वारे आपण केवळ इंग्रजीचे योग्य उच्चारण शिकू शकता आणि मनातील भीतीही घालवू शकता.

सदरच्या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारीत आहे. न्यूज 18 लोकमत याची खात्री देत नाही. याबाबतीत तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा

First published: March 27, 2020, 8:27 AM IST
Tags:

ताज्या बातम्या