Home /News /news /

सावधान! 1 एप्रिलला कोरोनाबाबत चुकूनही करू नका एप्रिल फूलचे मेसेज, नाहीतर...

सावधान! 1 एप्रिलला कोरोनाबाबत चुकूनही करू नका एप्रिल फूलचे मेसेज, नाहीतर...

1 एप्रिलनिमित्त नागरिकांकडून वेगवेगळ्या प्रकारचे मेसेज एप्रिल फुल बनवण्याकरता टाकले जाऊ शकतात.

    बारामती, 31 मार्च : एप्रिलचा महिना म्हटलं की सगळ्यांना फूल बनवण्याचा महिना आहे. पण यंदा मात्र कोरोनामुळे देशावर खूप मोठं संकट आलं आहे. त्याचा फैलाव रोखण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आलं आहे. पण तरीदेखील नियमांचं उल्लंघन झालेलं आपण पाहिलं आहे. अशात 1 एप्रिलनिमित्त नागरिकांकडून वेगवेगळ्या प्रकारचे मेसेज एप्रिल फुल बनवण्याकरता टाकले जाऊ शकतात, यात जमावबंदी लागू आहे. त्यामुळे सरकारकडून कठोर निर्णय घेण्यात आले आहेत. सर्व लोक रस्त्यावर एकत्र यावे अशा स्वरूपाचे मेसेज सोशल मीडियावर येण्याची शक्यता आहे, अशा एप्रिल फूलसाठी सोशल मीडियावर फिरणाऱ्या मेसेजवर कोणीही बळी पडू नये अन्यथा लोकांमध्ये गैरसमज निर्माण होऊन प्रशासनाच्या तसेच लोकांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. जर अशा स्वरूपाचे मेसेज लोकांकडून सोशल मीडियावर व्हायरल झाल्यास व्हायरल करणाऱ्या विरुद्ध तसेच त्या ग्रुप अॅडमिन विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचं बारामती उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर यांनी म्हटलं आहे, तसे लिखित स्वरूपाचे पत्रक ही त्यानी काढलं आहे. त्यामुळे कोणही नियमांचं उल्लंघन करून सोशल मीडियावर अफवा पसरवू नका, असं केल्यास कठोर कारवाई करण्यात येईल. दरम्यान, लॉकडाऊन आणि कोरोनासंदर्भात अनेक अफवा सोशल मीडियावर वारंवार समोर येत आहेत अशा अफवांना बळी न पडू नका आणि घरी राहून आपली व आपल्या घरच्यांची काळजी घ्या. अशा सुचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत. दरम्यान, एप्रिल फूल नावाखाली चेष्टा करू नये. विनाकारण देशात संचारबंदी असताना चेष्टाचा विषय केला जाता कामा नये असं आवाहान गृहमंत्र्यांकडून करण्यात आलं आहे.  एप्रिल फूल नावाखाली कोणी चेष्टा केली त्यासंबधी कोणी पोलिसाकडे तक्रार केली तर पोलीस योग्य ती दखल घेतील, पण लोकांनी ही चेष्टेचा विषय करू नका परिस्थितीच गांभीर्य ओळखा असं आवाहान गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केलं आहे. देशात कोरोना रुग्णांची संख्या 1251 वर दरम्यान, कोरोनाव्हायरस देशात फैलाव वाढत आहे. सोमवारी लॉकडाउनचा 6 वा दिवस होता, परंतु संक्रमित लोकांची संख्या वाढतच गेली. आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार संक्रमित लोकांची संख्या आतापर्यंत 1251 वर पोहोचली आहे. त्यापैकी 1117 सक्रिय प्रकरणे आहेत, तर 32 लोकांचा कोरोनाने बळी गेला आहे. मात्र, 102 जणांनी या आजारावर मातही केली आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोना रुग्ण महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. महाराष्ट्रात सर्वाधिक लोक संक्रमित झाले आहेत. सोमवारी महाराष्ट्रात 216 लोक संसर्गित झाले आहेत. राज्यात आतापर्यंत 10 लोकांचा मृत्यू झाला आहे, तर 39 लोकांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सोमवारी महाराष्ट्रात दोन लोकांचा मृत्यू झाला, त्यापैकी एकाचा मृत्यू पुण्यात आणि दुसरा मृत्यू हा मुंबईत झाला.
    Published by:Manoj Khandekar
    First published:

    पुढील बातम्या