जाहिरात
मराठी बातम्या / बातम्या / Karnataka Election : प्रियांका गांधी पोहोचल्या किचनमध्ये, मस्त बनवला डोसा, पण झालं उलटच VIDEO

Karnataka Election : प्रियांका गांधी पोहोचल्या किचनमध्ये, मस्त बनवला डोसा, पण झालं उलटच VIDEO

priyanka gandhi making dosa

priyanka gandhi making dosa

प्रियांका गांधी नेहमी प्रचारादरम्यान असं काही करत असतात ज्यामुळे त्यांची चर्चा होत असते.

  • -MIN READ
  • Last Updated :

म्हैसूर: कर्नाटका निवडणुकीचे वारे जोराने वाहू लागले आहेत. प्रचारसभांनाही जोर आला आहे. भाजप विरुद्ध काँग्रेस चुरशीची लढत आणि एकमेकांविरोधत सभा घेतानाही दिसत आहे. याच दरम्यान काँग्रेसच्या सभेपूर्वी काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी संपूर्ण देशाचं लक्ष वेधून घेतलं. प्रियांका गांधी नेहमी प्रचारादरम्यान असं काही करत असतात ज्यामुळे त्यांची चर्चा होत असते. यावेळी त्यांनी डोस तयार केला आहे.

कर्नाटकमध्ये भाजपचं टेन्शन वाढलं; ऐन निवडणुकीच्या तोंडावर मोठं बंड, माजी मुख्यमंत्र्यांचा तडकाफडकी राजीनामा

प्रियांका गांधी कर्नाटकमध्ये निवडणुकीच्या प्रचारासाठी काम करत असताना एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आल्या आहेत. त्यांनी न्यू सयाजी राव रोड, अग्रहारा, म्हैसूरच्या जवळ असलेल्या मैलारी हॉटेलमध्ये डोसा तयार केला.

त्यांनी हॉटेलमध्ये जाऊन खास डोसा तयार करण्याचा आनंद घेतला. यावेळी त्यांनी उपस्थित असलेल्या छोट्या मुलीसोबतही छान वेळ घालवला. म्हैसूरच्या प्रसिद्ध हॉटेलमध्ये त्यांनी नाश्तासाठी इडली आणि कुरकुरीत मसाला डोसा घेतला होता.

ठरलं! राष्ट्रवादी लढवणार कर्नाटक निवडणूक; ‘इतक्या’ जागांवर देणार उमेदवार

त्यांच्यासोबत राज्य पक्षाचे प्रभारी रणदीप सिंग सुरजेवाला, केपीसीसी प्रमुख डीके शिवकुमार आणि काही नेतेही यावेळी उपस्थित होते. हनूर येथील जोरदार प्रचारानंतर प्रियंका हॉटेल रेडिसन ब्लू प्लाझा इथे थांबल्या होत्या. त्यांच्या डोसा बनवताना आणि छोट्या मुलीसोबत गप्पा मारतानाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात