नवी दिल्ली, 1 फेब्रुवारी : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Finance Minister Nirmala Sitaraman ) आज केंद्रीय अर्थसंकल्प 2022 (Budget 2022) सादर करत आहेत. यावेळी अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी शिक्षण क्षेत्राबाबत (Education Sector) अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत. यामध्ये, डिजिटल शिक्षणाला (Digital Education) चालना देण्यासाठी तसेच आधीच अस्तित्वात असलेल्या सुविधांचा विस्तार करण्यासाठी अनेक नवीन प्रकल्पांची घोषणा करण्यात आली आहे. डिजिटल शिक्षणाला चालना देण्यासाठी डिजिटल विद्यापीठ निर्माण करण्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी आली आहे. यासोबतच ‘वन क्लास, वन टीव्ही चॅनल’ (One Class, One TV Channel) योजनेअंतर्गत 200 टीव्ही चॅनलपर्यंत वाढवण्याची घोषणा करण्यात आली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी सांगितले की, शिक्षणात सुधारणा करण्याच्या आणि प्रत्येक मुलासाठी शिक्षण सुलभ करण्याच्या उद्देशाने प्रादेशिक भाषांमधील 200 टीव्ही चॅनेलद्वारे इयत्ता 1 ते 12 वीच्या मुलांपर्यंत पोहोचवले जाईल. आतापर्यंत फक्त 12 टीव्ही चॅनेल्सच्या माध्यमातून मुलांना शिक्षण मिळत होते. पुढच्या तीन वर्षात 400 वंदे भारत रेल्वे सुरु होणार देशभरात रेल्वेचा जाळं आणि मजबूत करण्यावर भर देणार असल्याचं अर्थमंत्र्यांनी म्हटलं आहे. पुढच्या तीन वर्षात 400 वंदे भारत रेल्वे (Vande Bharat Railway) सुरु होणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे. वन स्टेशन वन प्रोडक्ट (One Station One Product) योजना आणणार असल्याची घोषणाही त्यांनी केली. छोट्या शहरात काम करणाऱ्या उद्योजकांना याचा लाभ होणार आहे. पुढच्या तीन वर्षात 400 वंदे भारत रेल्वे सुरु होणार आहेत. शहरांमध्ये वाहतुकीसाठी महत्त्वाचे मानल्या जाणाऱ्या मेट्रोच्या विकासासाठी प्रयत्न करणार आहे. मेट्रोचं जाळं प्राधान्यानं विकसित करणार असल्याची घोषणाही अर्थमंत्र्यांनी केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.