जाहिरात
मराठी बातम्या / बातम्या / तुम्हाला श्वसन, हाडांशी संबंधीत समस्या जाणवतात का? मग तुमच्या शरीरात 'या' व्हिटॅमिनची कमतरता आहे, जाणून घ्या सविस्तर

तुम्हाला श्वसन, हाडांशी संबंधीत समस्या जाणवतात का? मग तुमच्या शरीरात 'या' व्हिटॅमिनची कमतरता आहे, जाणून घ्या सविस्तर

प्रतिकात्मक फोटो, सोर्स : गुगल

प्रतिकात्मक फोटो, सोर्स : गुगल

सातत्यानं धाप लागणं, हाडांमध्ये वेदना जाणवणं, जखम लवकर भरून न येणं अशाप्रकारच्या समस्या जर तुम्हाला जाणवल्या, तर समजा की यामागे बऱ्याचदा व्हिटॅमिनची कमतरता (Vitamin Deficiency) हे कारण आहे.

  • -MIN READ Trending Desk Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

    मुंबई 12 सप्टेंबर : आरोग्य उत्तम राहण्यासाठी शरीराराला परिपूर्ण पोषण आवश्यक आहे. याकरिता रोजच्या आहारात व्हिटॅमिन, मिनरल्सयुक्त पदार्थांचा समावेश गरजेचा असतो. बऱ्याचदा काही कारणांमुळे आपलं परिपूर्ण आहाराकडे दुर्लक्ष होतं. त्यामुळे शरीराला योग्य प्रमाणात व्हिटॅमिन (Vitamins), मिनरल्स (Minerals) मिळत नाहीत. परिणामी, शारीरिक तक्रारी सुरु होतात. ज्यामध्ये चालताना किंवा अन्य प्रकारच्या हालचाली करताना आपल्याला काही वेळा धाप लागते, श्वास घेण्यास काहीसा त्रास जाणवतो.

    तसे पाहाता ही गोष्ट सर्वसामान्य असते. मात्र सातत्यानं धाप लागणं, हाडांमध्ये वेदना जाणवणं, जखम लवकर भरून न येणं अशाप्रकारच्या समस्या जर तुम्हाला जाणवल्या, तर समजा की, यामागे बऱ्याचदा व्हिटॅमिनची कमतरता (Vitamin Deficiency) हे कारण आहे. त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष करु नका. तसेच शरीरासाठी व्हिटॅमिन ‘डी’ फारच महत्वाचे आहे.

    सुर्यप्रकाश (Sunshine) हा व्हिटॅमिन ‘डी’ चा प्रमुख स्रोत आहे. त्यामुळे रोज सकाळी काही वेळ सूर्य प्रकाशात बसल्यास या व्हिटॅमिनची कमतरता दूर होऊ शकते.

    हे वाचा : दुधी भोपळ्याचे हे फायदे तुम्हाला माहितीयत का? यामुळे लठ्ठपणा, गॅसची समस्या देखील होईल दूर

     आहाराचा विचार करता, फोर्टिफाइड फूड्स (Fortified Foods) आणि सप्लिमेंट्सच्या मदतीनं व्हिटॅमिन डीची कमतरता दूर करता येते. जर तुम्ही मांसाहार करत असाल तर तुम्हाला फारशी व्हिटॅमिन ‘डी’ ची कमी जाणवणार नाही. तुम्ही यासाठी सॅल्मन मासा (Salmon fish) खाऊ शकता, तो व्हिटॅमिन ‘डी’ चा चांगला स्रोत आहे.

    अंडी (Eggs) व्हिटॅमिन डीचा उत्तम स्त्रोत आहे. त्यामुळे आहारात अंड्यांचा समावेश करणं गरजेचं आहे. अंड्यामध्ये या व्हिटॅमिनसोबतच प्रोटिन, फॅट आणि खनिजं मुबलक असतात. मशरुममध्ये ही (Mushrooms) व्हिटॅमिन डी चांगल्या प्रमाणात असतं. त्यामुळे मशरुमची भाजी, सॅंडविच किंवा पास्ता या व्हिटॅमिनची गरज भागवू शकतो.

    हे वाचा : Green Apple चे हे फायदे तुम्हाला माहितीयत का? वजन कमी करण्यापासून ते वृद्धत्व थांबवण्यासाठी देखील फायदेशीर

    व्हिटॅमिन डीची कमतरता भरून काढण्यासाठी रोज काहीवेळ सूर्यप्रकाशात बसणं गरजेचं आहे. आठवड्यातून तीन वेळा 15 मिनिटे सूर्यप्रकाश अंगावर घेतल्यास शरीरात व्हिटॅमिन डीची कमतरता निर्माण होत नाही.

    News18लोकमत
    News18लोकमत

    शरीरात व्हिटॅमिन डीची कमतरता निर्माण झाली तर श्वसनास त्रास होणं, धाप लागणं, स्नायू अशक्त वाटणं, बोन डेन्सिटी कमी झाल्याने हाडांमध्ये तीव्र वेदना होणं, जखम भरून येण्यास वेळ लागणं, लहान मुलांमध्ये दात येताना अडचणी निर्माण होणं या समस्या निर्माण होतात. त्यामुळे या समस्या किंवा अशी लक्षणं दिसत असतील तर तातडीने तपासणी करून उपचार सुरू करणं गरजेचं आहे.

    (विशेष सूचना:  इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत याची कोणतीही खातरजमा करत नाही. आमचा उद्देश फक्त तुम्हाला माहिती देणं आहे.)

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात