जाहिरात
मराठी बातम्या / बातम्या / भारतात कोरोनाचा धोका वाढला, 24 तासात दर 2 मिनिटाला एक नवा रुग्ण

भारतात कोरोनाचा धोका वाढला, 24 तासात दर 2 मिनिटाला एक नवा रुग्ण

भारतात कोरोनाचा धोका वाढला, 24 तासात दर 2 मिनिटाला एक नवा रुग्ण

आता देशात रुग्णांचा आकडा हा 2902वर पोहोचला आहे. कोरोना रुग्णांचा हा वाढता आकडा खऱंतर नागरिकांची चिंता वाढवणारा आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 04 एप्रिल : भारताने कोरोनाला रोखण्यासाठी वेळीच सुरक्षित पाऊलं उचलली असतानाही कोरोनाचा फैलाव वेगाने वाढला आहे. भारतामध्ये गेल्या 24 तासांमध्ये कोरोनाची 601 नवी प्रकरणं समोर आली आहेत. यानंतर आता देशात रुग्णांचा आकडा हा 2902वर पोहोचला आहे. कोरोना रुग्णांचा हा वाढता आकडा खऱंतर नागरिकांची चिंता वाढवणारा आहे. शनिवारी जारी केलेल्या अहवालानुसार, मागच्या 24 तासांमध्ये देशात 601 नवे कोरोना रुग्ण समोर आले आहेत. म्हणजेच प्रत्येक दोन मिनिटाला एक व्यक्ती कोरोनाच्या जाळ्यात अडकत आहे. आतापर्यंत भारतात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 2902 पर्यंत वाढली आहे. त्यामध्ये 2650 सक्रिय प्रकरणं तर 183 रुग्ण बरे होऊन त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर मृतांची संख्या 68 वर पोहोचली आहे. अशी अधिकृत माहिती आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून जारी करण्यात आली आहे.

जाहिरात

दिल्लीत गेल्या चोवीस तासांत देशात सर्वाधिक रुग्ण समोर आले आहेत. 92 नवीन रूग्णांसह, कोरोनामुळे आजार झालेल्या रुग्णांची संख्या अचानक वाढून 386 वर पोहोचली आहे. 92 रूग्णांपैकी 77 रुग्ण मरकजशी संबंधित आहेत. भारतात राहणाऱ्या दोन परदेशी लोकांनाही कोरोना असल्याची पुष्टी झाली आहे. यानंतर परदेशी रुग्णांची संख्या 57 झाली आहे. महाराष्ट्र अजूनही या यादीत अव्वल आहे. येथे एकूण 423 कोरोनो प्रकरणे नोंदली गेली आहेत. यानंतर, तामिळनाडूमध्ये 411 आणि दिल्लीत 386 कोरोना बाधित रुग्ण आढळले. देशातही सर्वाधिक मृत्यू महाराष्ट्रात आहेत. येथे आतापर्यंत 27 लोकांनी प्राण गमावले आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: corona
  • First Published :
जाहिरात
जाहिरात