Home /News /news /

भाजप नेते आणि माजी मंत्री राम शिंदे यांना पितृशोक

भाजप नेते आणि माजी मंत्री राम शिंदे यांना पितृशोक

राम शिंदे यांचे वडील शंकर शिंदे यांचं वृद्धापकाळाने निधन झालं आहे.

    मुंबई, 4 जुलै : भाजप नेते आणि माजी मंत्री राम शिंदे यांचे वडील शंकर शिंदे यांचं वृद्धापकाळाने निधन झालं आहे. सायंकाळी 5 वाजता शंकर शिंदे यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्यावर उद्या सकाळी 10 वाजता जामखेड तालुक्यातील चोंडी इथं अंत्यसंस्कार होणार आहेत. राम शिंदे यांच्या वडिलांच्या निधनाचे वृत्त समजताच राजकीय क्षेत्रातील विविध नेत्यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह राष्ट्रवादीचे युवा नेते आणि आमदार रोहित पवार, भाजप आमदार राहुल कुल यांनीही आदरांजली वाहिली. दरम्यान, 'माझे वडील स्व.शंकर बापु शिंदे यांना आज सायंकाळी 5 वाजता देवाज्ञा झाली असून अंत्यविधी उद्या दि .5/7/2020 रोजी सकाळी 10 वाजता चोंडी तालुका जामखेड येथे होईल,' अशी माहिती राम शिंदे यांनी दिली.
    First published:

    Tags: Ram shinde

    पुढील बातम्या