मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /Mumbai NCB Seized Drugs : निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर मुंबई NCB ची मोठी कारवाई तब्बल 13 कोटींचे ड्रग्स जप्त

Mumbai NCB Seized Drugs : निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर मुंबई NCB ची मोठी कारवाई तब्बल 13 कोटींचे ड्रग्स जप्त

मुंबई NCB ने ब्राझीलहून आलेल्या महिलेकडून 3.20 किलो उच्च दर्जाचे ब्लॅक कोकेन जप्त केले आहे. तीन दिवसांच्या कारवाईत विविध शहरांतून याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. (Mumbai ncb seized drugs)

मुंबई NCB ने ब्राझीलहून आलेल्या महिलेकडून 3.20 किलो उच्च दर्जाचे ब्लॅक कोकेन जप्त केले आहे. तीन दिवसांच्या कारवाईत विविध शहरांतून याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. (Mumbai ncb seized drugs)

मुंबई NCB ने ब्राझीलहून आलेल्या महिलेकडून 3.20 किलो उच्च दर्जाचे ब्लॅक कोकेन जप्त केले आहे. तीन दिवसांच्या कारवाईत विविध शहरांतून याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. (Mumbai ncb seized drugs)

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, अमीत राय (29 सप्टेंबर) : मुंबई NCB ने ब्राझीलहून आलेल्या महिलेकडून 3.20 किलो उच्च दर्जाचे ब्लॅक कोकेन जप्त केले आहे. तीन दिवसांच्या कारवाईत विविध शहरांतून याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.  दरम्यान झालेल्या कारवाईने जोरदार चर्चा सुरू आहे. राज्यात पुढच्या काही काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. तसेच महापालीका निवडणुकाही कोणत्याही क्षणी लागणार असल्याने राज्यात कडक बंदोबस्त तैणात करण्यात आला आहे. दरम्यान मुंबई NCB ने ही कारवाई केल्याने यामध्ये कोणाचा हात आहे का? याबाबत तपास सुरू केला आहे.

मुंबई NCBने आंतरराष्ट्रीय ड्रग पुरवठा करणाऱ्यांना चांगलाच धक्का दिला आहे. एनसीबीने मुंबई विमानतळावर बोलिव्हियन महिलेकडून काळे कोकेन जप्त केले असून गोव्यातील एका नायजेरियन नागरिकालाही या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनंतर एनसीबीची याप्रकरणी मोठी कारवाई असल्याचे बोलले जात आहे. एनसीबीला माहिती मिळाली होती की एक बोलिव्हियन महिला ड्रग्ज घेऊन विमानाने मुंबईला पोहोचणार असून ती पुढे मुंबई आणि लगतच्या राज्यांमध्ये पाठवली जाणार आहे. यावर सापळा रचत NCB ने मोठी कारवाई केली आहे.

हे ही वाचा : पालघरमध्ये तरुणीवर झालेल्या गोळीबाराचा Live Video, मदत करण्याऐवजी वाटसरूने काढला पळ

एनसीबीने महिलेची ओळख पटवण्यासाठी एक टीम तयार केली होती. NCB ने ब्राझीलहून गोव्याला जात असलेल्या एका बोलिव्हियन महिलेची ओळख पटवली, ती महिला मुंबईत फ्लाइट बदलणार होती. एवढ्यात एनसीबीकडून या महिलेची आधीच ओळख पटवली. त्यानंतर एनसीबी-मुंबईचे अधिकारी मुंबई विमानतळावर रवाना झाले आणि बोलिव्हियन महिलेची शारीरिक तपासणी करण्यासाठी एक टीम तयार केली. 26 सप्टेंबर रोजी विमान मुंबई विमानतळावर उतरल्यानंतर लगेचच विमानतळावर बोलिव्हियन महिलेची ओळख पटली, जी गोव्याला जाणाऱ्या कनेक्टिंग फ्लाइटमध्ये चढणार होती.

दरम्यान त्या महिलेची कसून चौकशी करण्यात आली यामध्ये तीने उत्तर देण्यास टाळाटाळ केल्यावर महिलेच्या सामानाची झडती घेण्यात आली. झडतीदरम्यान महिलेच्या बॅगेतून 12 पाकिटे जप्त करण्यात आली. चौकशीनंतर महिलेने सांगितले की जप्त केलेले पॅकेट काळ्या कोकेनचे होते आणि एकूण वजन 3.2 किलो होते. यासोबतच गोव्यातील एका परदेशी व्यक्तीला हा माल पोहोचवायचा होताअशी कबुलीही महिलेने दिली आहे.

हे ही वाचा : लोन ॲपमुळे हत्या अन् आत्महत्येच्या घटनांनंतर खडबडून जागे झाले पुणे पोलीस, बंगळुरूमध्ये मोठी कारवाई

महिलेने दिलेल्या माहितीनंतर गोव्यात या परदेशी व्यक्तीची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आले आहे. गोव्यातील एका हॉटेलमध्ये सापळा रचून एका नायजेरियन व्यक्तीला पकडण्यात आले आहे. नंतर, नायजेरियन व्यक्तीने देखील आंतरराष्ट्रीय ड्रग सिंडिकेटचा भाग असल्याची कबुली दिली. हा नायजेरियन व्यक्ती ड्रग स्मगलर असून तो गोव्यात राहत होता आणि अनेक राज्यांमध्ये वेगवेगळ्या व्यापाऱ्यांना ड्रग्जचा पुरवठा करत होता.

First published:
top videos

    Tags: Crime news, Drug case, Drugs, Mumbai case, NCB