मुंबई, 12 जून : आध्यात्मिक गुरू भय्यूजी महाराज यांनी राहत्या घरी स्वत:वर गोळी झाडून जीवनयात्रा संपवली. भय्यूजी महाराज हे राजकीय पक्षांसाठी संकटमोचक होते. त्यांचे काँग्रेससह सर्वच पक्षांसोबत संबंध होते. भय्यूजी महाराज यांचं पूर्ण नाव उदयसिंह देशमुख आहे. त्यांचा गृहस्थ संत मानलं जातं पण ते आध्यात्मिक गुरू होण्याआधी वयाच्या 21 व्या वर्षी माॅडलिंग केली होती. मध्यप्रदेश आणि महाराष्ट्रमध्ये भय्यूजी महाराजांचा चाहता वर्ग आहे. त्यांची राष्ट्रीय पातळीवर ओळख निर्माण झाली 2011 मध्ये…जेव्हा त्यांनी अण्णा हजारे आणि सरकारमध्ये मधस्थीची भूमिका बजावली होती. त्यांच्या मध्यस्थीमुळे अण्णांनी उपोषण मागे घेतलं होतं. तेव्हा राज्यातून माजी केंद्रीय मंत्री विलासराव देशमुख यांनी भय्यूजी महाराज यांनी मध्यस्थी केली होती.
भय्यूजी महाराज राजकीय नेत्यांच्या संपर्कात कसे आले ? मध्यप्रदेश त्या इंदूर शहरात राहणारे भय्यूजी महाराज यांचं राजकीय कनेक्शन महाराष्ट्रातून जोडलं गेलं. भय्यूजींचं मुळ गाव हे महाराष्ट्रातील बुलडाणा जिल्ह्यात आहे. त्यामुळे त्यांचं गावात येणे जाणे होते. काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांच्यामुळे त्यांचा राजकीय संपर्क सुरू झाला. 1995 मध्ये अनिल देशमुख यांच्या माध्यमातून महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्यासोबत संपर्कात आले. भय्यूजी हे मराठा असल्यामुळे महाराष्ट्रात त्यांचा प्रभाव कायम राहिला. विलासराव देशमुख यांच्याशी जवळीक काँग्रेसचे दिवंगत नेते आणि माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याशी भय्यूजी महाराजांची जवळीक निर्माण झाली होती. विलासराव देशमुख यांच्या संपर्कामुळे राज्याच्या राजकारणात भय्यूजींची ओळख वाढली. 2000 मध्ये जेव्हा विलासराव मुख्यमंत्री होते, तेव्हा भय्यूजींचा जास्त वेळ महाराष्ट्रात राहत होते. त्यामुळे त्यांना राज्यात राजकीय अतिथीचा दर्जा मिळाला होता. काँग्रेसचे नेते भय्यूजी महाराजांपासून प्रभावीत होते. राष्ट्रवादी आणि भाजपचे नेते त्यांचा आदर करत होते. भाजपने गोपीनाथ मुंडे आणि नितीन गडकरी यांच्यासोबत भय्यूजी महाराजांचे घनिष्ठ संबंध होते. संबंधीत बातम्या
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.