
आयोडीनच्या कमतरतेमुळे थायरॉइड होतो असं मानलं जातं. पण व्यतिरिक्तसुद्धा अनेक कारणं आहेत ज्यामुळे थायरॉइड बळावतो. प्रत्येकाच्या गळ्यात एक फुलपाखराच्या आकारासारखी थायरॉइड ग्रंथी (एंडोक्राइन ग्लँड) असते. त्यातून निघणाऱ्या हॉर्मोन्सचं प्रमाण कमी किंवा जास्त झालं तर थायरॉइडची समस्या निर्माण होते.

शरिरात तयार होणारं मेटाबॉलिजम हे थायरॉइड हॉर्मोन्स नियंत्रित करतात. मात्र हॉर्मोन्सचं प्रणाम कमी-जास्त झालं तर हायपरथायरॉइड किंवा हायपोथायरॉइड अशा समस्या उद्भवतात. थायरॉइड समस्येमुळे एकतर अचानक वजन वाढतं किंवा कमी होतं. अनेकांचे केसंही गळतात.

जर या आजाराकडे दुर्लक्ष केलं तर मधुमेह होऊ शकतो. आयुर्वेदात थायरॉइड वाढू नेय यासाठी अनेक उपायोजना सांगितल्या आहेत.

ज्याला थायरॉइडची समस्या आहे त्याने आहारात दही आणि दूध जास्त प्रमाणात घ्यायला हवं. कॅल्शियम, मिनरल्स आणि व्हिटॅमिनमुळे स्वस्थ उत्तम राहतं.

आलं ज्याला हिंदीमध्ये अदरक म्हणतात. आल्यात पोटॅशियम, मॅग्नेशियम हे त्तत्व थायरॉइड कमी करण्यास लाभदायक ठरतात. आल्यातील एंटी-इन्फ्लीमेंट्री हे गुण थायरॉइड वाढण्यापासून रोखतात.

थायरॉइड ग्रस्तांना थकवा जास्त जाणवतो. अशात ज्येष्ठमधाच्या सेवनाने त्यांना चांगला फायदा होतो. ज्येष्ठमधातील गुणकारी तत्व थायरॉइड ग्रंथीचं संतुलन बिघडू देत नाही. ज्येष्ठमधात कन्सर रोखण्याचेही गुण आहेत.

थायरॉइड ग्रंथी वाढण्यापासून रोखण्यासाठी गहू आणि ज्वारीचं तुम्ही सेवन करायला हवं. थायरॉइडची समस्या दूर करण्यासाठी आयुर्वेदात हा सर्वात सोपा आणि उत्तम उपाय सांगितला आहे. याशिवाय सायनस, उच्च रक्तदाब आणि रक्ताची कमी अशा विविध समस्यांवरही हा प्रभावी उपाय आहे.

थायरॉइडग्रस्तांनी जितक्या जास्त फळ आणि भाज्या सेवन केल्या तितका त्यांना लाभ होतो. फळांमध्ये आणि भाज्यांमध्ये एंटीआक्सिडेंट असतं. जे थायरॉइडला वाढण्यापासून रोखतं.




