मुंबई, 10 जून : मुंबई क्रूझ ड्रग्ज (Mumbai Cruise Drugs Case) प्रकरणात अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला 28 मे रोजी क्लीन चिट देण्यात आली आहे. नोव्हेंबर 2021 मध्ये, शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान आणि इतर 19 जणांविरुद्ध ड्रग्ज बाळगणे आणि सेवन केल्याच्या आरोपांची स्वतंत्रपणे चौकशी करण्यासाठी एक विशेष तपास पथक (SIT) स्थापन करण्यात आलं होतं. हे पथक त्यावेळी समीर वानखेडे यांच्या अध्यक्षतेखाली नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या (NCB) विभागीय संचालनालयाने तयार केलेल्या प्रकरणाचा तपास करत होतं.
2 ऑक्टोबर रोजी मुंबई बंदरात कॉर्डेलिया क्रूझ ड्रग्सच्या बस्टमध्ये NCB ने आर्यन खान आणि इतर पाच जणांना अटक केल्यानंतर एका महिन्यानंतर ही घटना घडली. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात अवैध ड्रग्ज जप्त करण्यात आल्याचा दावा करण्यात आला होता आणि यात आर्यनचा संबंध आंतरराष्ट्रीय ड्रग्ज सिंडिकेटसह असल्याचं म्हटलं होतं. आरोप सिद्ध झाले असते तर आर्यनला नार्कोटिक ड्रग्ज अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस (एनडीपीएस) कायदा, 1985 अंतर्गत सहा महिने ते 20 वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा होऊ शकली असती. परंतु, मागील वर्षी 20 दिवसांपेक्षा जास्त काळ कोठडीत घालवलेल्या आर्यन खानला खटल्यातील पुरेशा पुराव्याअभावी 28 मे 2022 पर्यंत सर्व आरोपांमधून मुक्त करण्यात आलं आहे.
आता आर्यन खानने विचारलंय, हे सर्व माझ्यासोबत होण्याची गरज होती का?
इंडिया टुडे मॅगझिनच्या कव्हर स्टोरीमध्ये, राज चेंगप्पा यांच्या 'लेसन्स फ्रॉम द आर्यन खान केस' या शीर्षकात, एसआयटीचे प्रमुख असलेले एनसीबीचे उपमहासंचालक (ऑपरेशन्स) संजय सिंह यांनी आर्यन खानसोबतचे संभाषण उघड केले आहे. मुलाखतीत संजय सिंह म्हणाले की, आर्यन खान अशा प्रकारचा प्रश्न विचारेल अशी त्यांना अपेक्षा नव्हती. त्यांनी आर्यन खानची चौकशी पूर्वग्रह न ठेवता करण्याचं आश्वासन दिलं. यानंतर आर्यनने विचारलेला प्रश्न विचार करायला लावणारा होता, असं संजय म्हणाले.
आर्यन खानने त्यांना विचारलं, "सर, तुम्ही मला आंतरराष्ट्रीय ड्रग्ज तस्कर म्हणून रंगवलं आहे. की, मी अंमली पदार्थांच्या तस्करीला वित्तपुरवठा करतो. हे आरोप मूर्खपणाचे नाहीत का? त्या दिवशी त्यांना माझ्याकडे कोणतेही ड्रग्ज सापडले नाहीत आणि तरीही त्यांनी मला अटक केली. सर, तुम्ही माझ्यावर खूप अन्याय केला आहे आणि माझी प्रतिष्ठा खराब केली आहे. मला इतके आठवडे तुरुंगात का घालवावे लागले? मी खरोखरच त्याला पात्र आहे का?"
शाहरुख खान म्हणाला, आम्हाला सैतान म्हणून रंगवण्यात आलं
तपासादरम्यान संजय सिंग यांना कळलं की, आर्यनचा पिता अभिनेता शाहरुख खानलाही त्यांना भेटायचं होतं. संजय सिंग इतर आरोपींच्या पालकांना भेटले असल्याने त्यांनी शाहरुखलाही भेटण्याचं मान्य केलं. शाहरुख आणि संजय सिंग यांना भेटला, तेव्हा शाहरुखने आपल्या मुलाच्या मानसिक आणि भावनिक स्थितीबद्दल चिंता व्यक्त केली. तो म्हणाला की, आर्यनला रात्री नीट झोप येत नव्हती आणि रात्रभर त्याची सोबत करण्यासाठी शाहरुखला स्वतः आर्यनच्या बेडरूममध्ये जावं लागलं.
शाहरुखने असंही म्हटलं आहे की, आर्यनच्या विरोधात कोणतेही ठोस पुरावे नसतानाही त्याच्या मुलाचा 'अपमानित' केलं जात आहे. जवळजवळ अश्रू ढाळत, शाहरुख खानने संजय सिंग यांना सांगितलं की, "आम्हाला मोठे गुन्हेगार किंवा राक्षस म्हणून रंगवलं गेलं आहे, जे समाजाचा नाश करण्यासाठी निघाले आहेत आणि आम्ही दररोज खूप मेहनत घेतो आहे." आर्यन खानला 28 मे रोजी ड्रग्ज प्रकरणी क्लीन चिट देण्यात आली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Aryan khan, Drugs, NCB, Shahrukh khan