उत्पादन क्षेत्रात तेजी आल्यानेच आर्थिक विकास दर 6.3 टक्क्यांवर - अरुण जेटली

उत्पादन क्षेत्रात तेजी आल्यानेच आर्थिक विकास दर 6.3 टक्क्यांवर - अरुण जेटली

अरुण जेटली म्हणाले, नोटाबंदी आणि जीएसटीचा प्रभाव आता समाप्त झाला असून, सकारात्मक परिणाम दिसतो आहे. ही तेजी येत्या तिमाहीतही कायम राहील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. आर्थिक विकास दर वाढण्याचं मुख्य कारण म्हणजे उत्पादन क्षेत्रात आलेली तेजी आहे.

  • Share this:

30 नोव्हेंबर, नवी दिल्ली : देशाचा आर्थिक विकास दर 6.3 टक्क्यांवर पोहोचल्याने केंद्र सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या तिमाहीत आर्थिक विकासदरात 5.7 इतकी निचांकी घट झाल्याने केंद्र सरकारच्या आर्थिक धोरणांवर चोहोबाजूनी टीका होत होती. पण या तिमाहीत विकास दरात 6.3 इतकी वाढ दिसून आल्याने केंद्र सरकारने नक्कीच मोठा नि:श्वास सोडलाय. या वाढीव विकासदरामुळे अनेक क्षेत्रात तेजी येईल, असा आशावाद केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी व्यक्त केलाय.

अरुण जेटली म्हणाले, नोटाबंदी आणि जीएसटीचा प्रभाव आता समाप्त झाला असून, सकारात्मक परिणाम दिसतो आहे. ही तेजी येत्या तिमाहीतही कायम राहील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. आर्थिक विकास दर वाढण्याचं मुख्य कारण म्हणजे उत्पादन क्षेत्रात आलेली तेजी आहे. आणि ही वाढ तिस-या आणि चौथ्या तिमाहीतही पाहायला मिळू शकते. परदेशी गुंतवणूकदारांसाठी देशातील परिस्थिती सुधारत चालली आहे. उत्पादन क्षेत्रातही तेजी आली आहे. पुढच्या तिमाहीतही अर्थव्यवस्थेचा विकासदर आणखी वाढण्याची आशा आहे. मोदी सरकारच्या कठोर निर्णयांमुळे अर्थव्यवस्थेला आणखी मजबुती आली आहे, असंही जेटली म्हणाले.

गुजरात निवडणुकीच्या प्रचारादरम्यानही आता भाजपकडून या वाढीव विकासदराचं मोठं भांडवलं केलं जाऊ शकतं. कारण नोटबंदी आणि जीएसटी याच दोन मुद्यांवरून काँग्रेसच्या राहुल गांधींनी गुजरात इलेक्शनमध्ये मोदी-शहा जोडगोळीच्या नाकात दम आणला होता.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 30, 2017 10:33 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading