
औषधपेक्षाही मास्क हाच कोरोनापासून संरक्षण करू शकतो असा दावा अमेरिकेच्या Centers for Disease Control and Preventionचे संचालक डॉ. रॉबर्ट रेडफिल्ड यांनी केला आहे.

मास्क हा परिणामकारक असला तरी अमेरिकन लोक मास्क घालण्याचे टाळत आहेत. कोरोनाची साथ रोखायची असेल तर मास्क घाला असं आवाहनही त्यांनी केलं.

मास्क, सोशल डिस्टन्सिंग आणि स्वच्छता ही कोरोनाला रोखण्याची त्रिसूत्री असल्याचंही त्यांनी सांगितलं.

मास्कचा वापर केला तर कोरोनाला रोखता येतं आणि कोरोनापासून संरक्षणही मिळते असा दावाही डॉ. रॉबर्ट रेडफिल्ड यांनी केला आहे.




