मुंबई, 4 एप्रिल: लॉकडाऊनदरम्यानच्या सध्याच्या काळात आठवड्याभराचा किराणा माल किंवा महिन्याभराची औषधे यांसारख्या आवश्यक वस्तू आणण्यास परवानगी आहे. संपूर्ण देश 21 दिवसांच्या लॉकडाऊन काळात तणावाखाली आहे. परंतु वृद्धावस्थेमुळे, आजारपणामुळे किंवा बाळाची अथवा अपंगत्व असलेल्या व्यक्तींची एकट्याने काळजी घेणार्यांना दुकानात जाता येत नसणार्यांचे काय? आपल्यासारखे अनेक लोक घरात राहत आहेत व सामाजिक अंतर ठेवत आहेत, यामागे अनेक कारणे आहेत. असे असूनही आपल्या सर्वांना अन्न, औषधे व दैनंदिन जीवनातील इतर आवश्यक वस्तूंची गरज भासते. आपला जीव धोक्यात टाकून याच गोष्टी दारोदारी वेळेत पुरवणारे हजारो धाडसी डिलिव्हरी एजंट्स आहेत. अशा आणीबाणीच्या परिस्थितीत कोणतीही तक्रार न करता, न थकता व जबाबदारीने आपले काम पार पाडणार्या कंपन्यांना व त्यांच्या कर्मचार्यांना आपण सर्वांनीच सलाम केला पाहिजे. संपूर्ण देशात या सुविधा दररोज उपलब्ध करून देशवासीयांना मदत करणार्या लोकांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्याची आठवण म्हणून, Amazon, BigBasket, Grofers आणि MedLife एक हृदयस्पर्शी व्हिडिओ सादर करत आहेत. #HumSabEkSaath हे गान गाऊन ते सर्वांना घरी राहण्यास व सुरक्षित राहण्याचे आवाहन करतात. एकाच ध्येयाने एकत्र आलेले हे लोक चिंतित असलेल्या नागरिकांना त्यांच्या दारोदारी ताजी उत्पादने, जीवनरक्षक औषधे व इतर आवश्यक वस्तू पुरवून आपली सेवा सुरू ठेवण्याचे आश्वासन देतात. सामाजिक अंतर ठेवण्याबाबतचे सर्व नियम पाळून व अल्पावधीत सादर केलेल्या या व्हिडिओने अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत, ‘सर्वांनी एकत्र येऊन आपण सारे भारतीय एक आहोत’ असा संदेश दिला आहे. #TogetherForIndia हा व्हिडिओ इथे पहा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)








