विवेक ओबेरॉयच्या त्या ट्वीटचं उत्तर देणार होता अभिषेक, ऐश्वर्याने घेतला हा निर्णय

विवेक ओबेरॉयच्या त्या ट्वीटचं उत्तर देणार होता अभिषेक, ऐश्वर्याने घेतला हा निर्णय

विवेकने जेव्हा ट्वीट शेअर केलं तेव्हा ऐश्वर्या कान महोत्सवासाठी गेली होती. तिथे तिला या सर्व प्रकरणाबद्दल कळलं तेव्हा तिला धक्काच बसला.

  • Share this:

मुंबई, 26 मे- बॉलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉयने त्याच्या ट्विटर अकाउंटवरून एग्झिट पोलशी निगडीत एक मीम शेअर केले. या मीममुळे तो चांगलाच अडचणीत आला होता. या मीममध्ये ऐश्वर्या राय- बच्चनचा फोटोसह मुलगी आराध्या आणि अभिषेक बच्चनचे फोटोही होते. यावरून महिला आयोगाने विवेकला नोटीसही पाठवली होती. मात्र प्रकरण चिघळतंय हे जाणवताच विवेकने माफी मागत ट्वीट डिलीट केलं.

सोशल मीडियावर आपल्या या एक्स गर्लफ्रेंडला फॉलो करतो रणबीर कपूर

विवेकने शेअर केलेल्या या मीमवर सोशल मीडियावर तो चांगलाच ट्रोल झाला होता. अनेकांनी विवेकला खडे बोल सुनावले होते. या सगळ्यात लोक ऐश्वर्या आणि अभिषेकच्या उत्तराची वाट पाहत होते. दोघांनी यावर कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही. एवढंच नाही तर ऐश्वर्याच्या निकटवर्तीयांनीही यावर कोणतीच प्रतिक्रिया दिली नव्हती. मीडिया रिपोर्टनुसार, विवेकने जेव्हा ट्वीट शेअर केलं तेव्हा ऐश्वर्या कान महोत्सवासाठी गेली होती. तिथे तिला या सर्व प्रकरणाबद्दल कळलं तेव्हा तिला धक्काच बसला.

Bharat Dairies- कतरिना कैफचं हे हॉट साडी फॅशन स्टेटमेंट तुम्हीही करू शकता फॉलो

रिपोर्टनुसार, अभिषेकला विवेकच्या या मीमचं उत्तर द्यायचं होतं. मात्र ऐश्वर्याने त्याला थांबवलं. ऐश्वर्या अभिषेकला म्हणाली की, या प्रकरणात त्याने कोणतीच प्रतिक्रिया देऊ नये. विवेक हे सगळं पब्लिसिटी मिळवण्यासाठी करत आहे. यानंतर अभिषेकनेही यावर कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही.

ज्युनिअर एनटीआरचं मूळ नाव वाचून तुम्हीही व्हाल हैराण, जाणून घ्या त्याच्याशी निगडीत या 5 गोष्टी

सोशल मीडियावरही ट्रोल झाला विवेक-

सोशल मीडियावर विवेकने मीम शेअर केल्यानंतर लोकांनी त्याच्यावर चहूबाजूंनी टीका केली. यात अभिनेत्री सोनम कपूरनेही त्याचा विरोध केला. सोनमने विवेकचं ट्वीट दर्जाहीन आणि फालतू असल्याचं म्हटलं. विवेकनेही तिला जसंच्या तसं उत्तर दिलं.

बॉक्स ऑफिसवर नरेंद्र मोदी यांच्या बायोपिकचीच जादू, कमवले इतके कोटी

विवेकने सोनमला सिनेमांत ओव्हरअक्टिंग कमी करण्याचा आणि सोशल मीडियावर कमी रिअक्ट करण्याचा सल्ला दिला. याशिवाय मी गेल्या १० वर्षांपासून महिला सबळीकरणाचं काम करत असल्यामुळे महिलांच्या भावना दुखावण्याचा मी विचारही करू शकत नाही असं स्पष्टीकरण विवेकने दिलं.

मराठी बिग बॉस 2 च्या घरात कुणाची वर्णी? महेश मांजरेकरांनी सांगितलं गुपित

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 26, 2019 08:37 PM IST

ताज्या बातम्या