मुंबई, 20 एप्रिल : कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी लॉकडाऊन (Lockdown) लागू करण्यात आला आहे. त्यातच लॉकडाऊनमध्ये चित्रपट क्षेत्रातील अनेक अभिनेते मदतीसाठी पुढे आले आहेत. कोणी रोजंदारीवर काम करणाऱ्या मजुरांना मदत केली तर कोणी संकटात असलेल्या लोकांच्या रेशनची व्यवस्था केली. अभिनेता प्रकाश राजदेखील गरजुंच्या मदतीसाठी धावून गेले आहेत. त्यांनी ट्विट करीत एक माहिती दिली आहे, त्यानुसार सध्या त्यांची आर्थिक स्थिती बिकट झाल्याचे त्यांनी सांगितले. इतकं की त्यांना आता पैसे कर्जाऊ घेण्याची वेळ आली आहे.
अभिनेते प्रकाश राज (Prakash Raj) आपल्या फाऊंडेशनच्या माध्यमातून गरीबांची मदत करीत आहेत. मात्र अशातच त्यांनी एक ट्विट केलं आहे. जी सोशल मीडियावर खूप व्हायरल झाली आहे. त्यांनी लिहिलं आहे की, माझी वित्तीय संसाधनं कमी होत चालली आहे. मात्र मी लोन घेऊन गरजुंची मदत करीन. कारण मला माहित आहे, मी दुसऱ्यांना कमावू शकतो. जर माणुसकी या कठीण काळात जिवंत ठेवायची असेल तर एकत्र येऊन लढूया. त्यानंत जीवनाच्या दिशेने पुढे जाऊ. प्रकाश राज यांच्या या ट्विटला खूप प्रतिक्रिया मिळत आहे. आतापर्यंत त्यांनी गरजुंना मोठी मदत केली आहे. त्यांच्या कामाचं सोशल मीडियावर मोठं कौतुक केलं जात आहे. संबंधित - घराचा गाडा ओढण्यासाठी छोटंसं दुकान चालवते सीएम योगी आदित्यनाथांची सख्खी बहीण