Home /News /news /

मुंबई-आग्रा हायवेवर कार नाल्यात आदळली, भीषण अपघातात पोलीस उपअधीक्षकाचा जागीच मृत्यू

मुंबई-आग्रा हायवेवर कार नाल्यात आदळली, भीषण अपघातात पोलीस उपअधीक्षकाचा जागीच मृत्यू

ससाणे आपल्या कारने अमळनेरकडे जात असताना कारवरील नियंत्रण सुटल्यानं कार महामार्गाच्या कडेला असलेल्या नाल्यात आदळली आणि यात भीषण अपघात झाला.

चांदवड, 11 जून : मुंबई-आग्रा महामार्गावर एका कारचा भीषण अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. धक्कादायक म्हणजे या अपघातामध्ये पोलीस उपअधीक्षक राजेंद्र ससाणे यांचा यामध्ये मृत्यू झाला आहे. आज दुपारी 2 वाजेच्या सुमारास हा अपघात झाल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. पोलीस अपघातस्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू असल्याचं सांगण्यात येत आहे. मुंबई-आग्रा महार्गावर वडालीभोई जवळ झालेल्या कार अपघातात अमळनेरचे पोलिस उपअधीक्षक राजेंद्र ससाणे यांचा जागीच मृत्यू झाला. ससाणे आपल्या कारने अमळनेरकडे जात असताना कारवरील नियंत्रण सुटल्यानं कार महामार्गाच्या कडेला असलेल्या नाल्यात आदळली आणि यात भीषण अपघात झाला. डोक्याला जोरात मार लागल्यामुळे ससाणे यांचा जागीच मृत्यू झाला. मुंबईत भयंकर प्रकार, कोरोना रुग्णाचा मृतदेह उघडून मारली मिठी आणि नंतर... स्थानिकांकडून अपघाताची माहिती पोलिसांना देण्यात आल्यानंतर नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक आरती सिंग यांच्यासह इतर अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. ससाणे यांचा मृतदेह चांदवडच्या शासकीय रुग्णालयात आणण्यात आला. पण तिथे त्यांना मृत घोषित करण्यात आलं. या प्रकरणी पोलिसांनी अपघाताची नोंद करून तपास सुरू केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ससाणे यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी नजिकच्या स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. या अपघाताची माहिती ससाणे यांच्या कुटुंबियांना देण्यात आली आहे. ससाणे यांच्या अशा अकाली जाण्यामुळे संपूर्ण पोलीस दलावर शोककळा पसरली असून त्यांच्या कुटुंबियांवर दुखाचा डोंगर कोसळला आहे. संपादन - रेणुका धायबर
Published by:Renuka Dhaybar
First published:

पुढील बातम्या