कानपुर, 11 डिसेंबर : हाणामारीचे अनेक व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील असाच एक व्हिडिओ आताही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. गर्ल्स कॉलेजजवळ उभ्या असलेल्या तरुणींवर कमेंट्स केल्यामुळे विद्यार्थीनींनी रोड रोमिओला चांगलंच धुतलं आहे. अँटी रोमिओ स्क्वॉडने या टवाळक्या करणाऱ्या तरुणांना पकडलं आणि बेदम मारहाण केली. महिला शिपाईने 27 सेकेंदामध्ये तब्बल 23 वेळा बुटांनी तरुणांना धुतलं. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यानंतर यांची पोलिसांत तक्रार करण्यात आली. कलम 294 अंतर्गत आरोपींवर कारवाई करण्यात येणार आहे.
#WATCH A woman constable thrashes a man for allegedly harassing girls on their way to school in Bithur area of Kanpur. (10.12.19) pic.twitter.com/avQpgk73Va
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) December 11, 2019
कानपूरच्या बिठूर चौकात गर्ल्स कॉलेजच्याजवळ टवाळक्या करणाऱ्या तरुणांचा अड्डा आहे. त्यांची कायम या परिसरात दहशत असते. मंगळवारी नेमके कॉलेजच्या आसपास पोलीस सक्रिय होते. गावात राहणारा अरविंद तिथून सुटलेल्या मुली विद्यार्थ्यांविषयी अश्लील भाष्य करीत होता. हे पाहून आधीपासून अस्तित्वात असलेल्या अँटी रोमियो संघाने अरविंदला पकडलं. कॉन्स्टेबल चंचल चौरसिया यांनी त्याला विद्यार्थ्यांसमोर धडा शिकविला. आरोपींना विद्यार्थ्यांसमोर हात जोडून क्षमा मागितली गेली. बिठूर पोलीस स्टेशनने दिलेल्या माहितीनुसार की, त्यांना पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आलं आणि कलम 294अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

)







