Home /News /news /

एक माणूस आयुष्यभरात किती शब्द बोलतो माहितीये का? आकडा जाणून होईल 'बोलती बंद'

एक माणूस आयुष्यभरात किती शब्द बोलतो माहितीये का? आकडा जाणून होईल 'बोलती बंद'

दिवसभरात आपण जे काही बोलतो त्यात किती शब्द असतात याबद्दल तुम्हाला कधी कुतूहल वाटलं का? (Fun Facts About Talking) एक व्यक्ती तिच्या संपूर्ण आयुष्यात किती शब्द बोलत असेल? असे काही प्रश्न तुम्हालाही कधीतरी पडत असतीलच

नवी दिल्ली 23 मे : संवाद साधण्यासाठी आपण दिवसभर कोणाशी ना कोणाशी तरी बोलत असतो. काही सांगणं, भावना व्यक्त करणं, मागणी करणं किंवा कामासाठीही आपल्याला बोलावं लागतंच. काही जणांचे तर जॉबही बोलण्याचेच असतात. आपल्यापैकी अनेकांना भरपूर बोलायची सवय असते. कित्येकजण तर अनोळखी लोकांशीही कितीतरी वेळ बोलू शकतात, तर काहीजणांना मात्र बोलायला अजिबात आवडत नाही. काहीजणांची बडबड मात्र थांबवणंही कित्येकदा अवघड होतं. दिवसभरात आपण जे काही बोलतो त्यात किती शब्द असतात याबद्दल तुम्हाला कधी कुतूहल वाटलं का? (Fun Facts About Talking) एक व्यक्ती तिच्या संपूर्ण आयुष्यात किती शब्द बोलत असेल? असे काही प्रश्न तुम्हालाही कधीतरी पडत असतीलच. Women Health: कळत-नकळत अनेक महिला करतात या चुका; डेली लाईफवर त्याचा होतो वाईट परिणाम आपण अगदी सकाळपासून रात्रीपर्यंत काही ना काही बोलतच असतो. ज्यांना फार बोलायला आवडत नाही, सहाजिकच ते कमी बोलतात. पण ज्यांना जास्त बोलायची सवय असते ते किती बोलत असतील? ब्रिटिश लेखक आणि ब्रॉडकास्टर गेल्स ब्राड्रेंर्थ (Gyles Brandreth) याने याबद्दलच काही अंदाज वर्तवले आहेत आणि याच्याशी संबंधित काही मजेशीर वस्तुस्थिही समोर आणली आहे. Gyles Brandreth याने The Joy of Lex: How to Have Fun with 860,341,500 Words हे पुस्तक लिहिलं आहे. एक व्यक्ती आपल्या संपूर्ण आयुष्यात 860,341,500 इतके शब्द तरी किमान बोलतेच, असं त्यानं या पुस्तकात म्हटलं आहे. हा आकडा बघून तुम्हाला धक्का बसला असेल. पण या आकड्याशी संबंधित काही मनोरंजक वस्तुस्थिही गेल्स यांनी सांगितली आहे. 86 कोटी हा काही छोटा आकडा नाही. याची तुलना केली तर तुम्हाला आणखी धक्का बसेल. ऑक्सफर्ड इंग्लिश डिक्शनरीचे 20 व्हॉल्युम्स भरतील इतकी ही शब्दसंख्या आहे. LinkedIn लर्निंग इन्स्ट्रक्टर Jeff Ansel याच्या मते, एक व्यक्ती दिवसभरात कमीतकमी 7000 शब्द तरी बोलतेच. अर्थात जास्त बोलायची सवय असलेले लोक यापेक्षा कितीतरी जास्त शब्दही बोलतात. जॉन मॉशिट्टा ज्यु (John Moschitta Jr) हा जगात सर्वांत जास्त वेगाने बोलणारा माणूस होता. जॉन एका मिनिटात 583 शब्द बोलू शकत असे. आपण बोलतो त्यातील 80 टक्के गॉसिप असतं आणि आपण फक्त 20 टक्केच कामाचं बोलतो, असं ब्रिटिश मानसशास्त्रज्ञ डॉ. निकोलस एल्मर (Dr. Nikolas Elmar) याचं मत आहे. तर आपल्या बोलण्यातील 60 टक्के भाग हा आपल्या स्वत:बद्दलचा असतो असं काही रिसर्चमधूनही स्पष्ट झालं आहे. आता तुम्हाला जास्त बोलायला आवडत असेल तर यापैकी कोणत्या फॅक्ट्स तुम्हाला लागू पडतात याचा विचार करा.
First published:

Tags: Human story, Lifestyle

पुढील बातम्या