मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /वैविध्य असूनही करोडो लोकांनी मानवतेसाठी एकत्र येत आदर्श घालून दिला आहे- त्यांच्या कथा आपल्याला Lifelong प्रेरणा देतील!

वैविध्य असूनही करोडो लोकांनी मानवतेसाठी एकत्र येत आदर्श घालून दिला आहे- त्यांच्या कथा आपल्याला Lifelong प्रेरणा देतील!

देशभरात असंख्य व्यक्ती त्यांच्यासाठी अपरिचित असलेल्या लोकांच्या मदतीसाठी धावून आल्या. त्यांनी औषधे, ऑक्सिजन, हॉस्पिटल बेड्स पुरवले तसेच अगदी आपल्या नातलगांच्या अंत्यसंस्कारांसाठी लांबच लांब रांगेत उभ्या असणाऱ्या लोकांना आधार दिला.

देशभरात असंख्य व्यक्ती त्यांच्यासाठी अपरिचित असलेल्या लोकांच्या मदतीसाठी धावून आल्या. त्यांनी औषधे, ऑक्सिजन, हॉस्पिटल बेड्स पुरवले तसेच अगदी आपल्या नातलगांच्या अंत्यसंस्कारांसाठी लांबच लांब रांगेत उभ्या असणाऱ्या लोकांना आधार दिला.

देशभरात असंख्य व्यक्ती त्यांच्यासाठी अपरिचित असलेल्या लोकांच्या मदतीसाठी धावून आल्या. त्यांनी औषधे, ऑक्सिजन, हॉस्पिटल बेड्स पुरवले तसेच अगदी आपल्या नातलगांच्या अंत्यसंस्कारांसाठी लांबच लांब रांगेत उभ्या असणाऱ्या लोकांना आधार दिला.

पुढे वाचा ...

  कोविड-19चा भारताला जोरदार फटका बसला. आपल्या सारख्या सामर्थ्यवान लोकांनाही या रोगाने दुर्बल बनवले आहे. अपरिचित आणि जवळच्या संपर्काच्या परिघातून दूर लोटलेल्या व्यक्तींकडून मदतीचा हात मिळाला. खरेतर, आपल्या प्रियजनांना वाचवण्यासाठी धडपडणाऱ्या कुटुंबांना या कठीण प्रसंगाने जीवन आणि मृत्यू यांमधील अंतर दाखवून दिले आहे.

  देशभरात असंख्य व्यक्ती त्यांच्यासाठी अपरिचित असलेल्या लोकांच्या मदतीसाठी धावून आल्या. त्यांनी औषधे, ऑक्सिजन, हॉस्पिटल बेड्स पुरवले तसेच अगदी आपल्या नातलगांच्या अंत्यसंस्कारांसाठी लांबच लांब रांगेत उभ्या असणाऱ्या लोकांना आधार दिला. जात, पंथ किंवा सामाजिक स्थितीचा विचार न करता इतरांच्या मदतीला धावून आलेल्या या बहाद्दरांचे आभार मानावे तितके कमीच आहेत. त्यांच्यामुळे आम्हांला मानवतेचा खरा अर्थ समजला.

  ज्यांनी संसाधने तयार केली, ज्येष्ठांसाठी कनेक्ट अँड केअर सिस्टीम तयार केली आणि आपल्या उदरनिर्वाहासाठीच्या अत्यावश्यक गरजांच्या पूर्ततेची जबाबदारी अचानक येऊन पडलेल्या गृहिणी आणि ड्रायव्हर्ससाठी अॅप्स आणि व्यवसायसुद्धा निर्माण केले.

   

  प्रसारमाध्यमे जेव्हा मोठ्या बातम्यांना महत्त्व देत होती तेव्हाच हजारो सामान्य लोकांनी पुढे येऊन गरजवंतांना मदत करण्याचा उपक्रम हाती घेतला. कोविडग्रस्त रुग्ण आणि गरजूंना जीवनावश्यक शिधा, औषधे आणि अन्य जीवनावश्यक साधनांचे वितरण करण्यासाठी आपल्या घरापासून मैलोन्मैल सायकलवरून प्रवास करणाऱ्या हैदराबादमधील Air India( एअर इंडिया)चे निवृत्त कर्मचारी, केआर श्रीनिवास राव( 70 वर्षे) यांच्यासारख्या अनेक लोकांच्या सत्यकथा आपण ऐकलेल्या आहेत.

  अन्य एका प्रकरणी, आपल्या समुदायासाठी मदत करण्यास सुरुवात केलेल्या युवकांच्या एका समुहाला त्यांच्यापर्यंत पोहोचणाऱ्या मोठ्या संख्येतील लोकांना मदत करण्यासाठी आपली क्षमता वाढवण्याची गरज वाटू लागली. अर्णव प्रणीत हा विद्यार्थी आणि प्रारंभिक प्रशासकांनी पडताळलेल्या वास्तव संसाधनांचा एक डेटाबेस तयार केला. त्याच्याबरोबर अयान खान, आदित्य अगरवाल, सुदिप्तो घोष, मुदित अगरवाल, हरभजनसिंग पुजारी, देबोध्वनी मिश्रा, देबादित्य हलदर, विश्वम श्रीवास्तव, जयदित्य झा, आदित्य गांधी, शिवम सोळंकी, प्रखर भार्गव, अवी सहगल आणि ईप्सिता चौधरी  यांनी कार्य केले.

  त्यांनी मदतीसाठी, ऑक्सिजन मिळवण्यासाठी, गंभीर प्रकरणांच्या हाताळणीसाठी कुठे जावे आणि बऱ्याच बाबतीत जनजागृती करण्यासाठी सोशल मिडीयाचा पुरेपूर वापर केला. या उत्साही, सज्जन युवकांच्या चमूमध्ये शेकडो स्वयंसेवक सहभागी होऊन त्यांना बळकटी मिळाली आणि त्यांनी सर्वाधिक म्हणजे दररोज 20 गंभीर रुग्ण हाताळले. पुढच्या काळात त्यांनी एक वेबसाईट आणि एक हेल्पलाईनही तयार केली आहे जेणेकरून सोशल मिडिया न वापरणाऱ्या गरजूंपर्यंत पोहचता येईल.

  हे सर्व एवढ्यावरच थांबत नाही. काहीजण याच्याही पुढे गेले आहेत. पुण्यातील अक्षय कोठावळे या रिक्षाचालकाने आपल्या लग्नासाठी साठवलेले 2 लाख रुपये खर्च करून गेल्यावर्षीच्या मार्च महिन्यापासून 1550 पेक्षा अधिक कुटुंबांना अन्न आणि शिधा वितरीत केला आहे. आणि आजही तो शहरातील स्थलांतरित कामगारांना अन्नाची पाकिटे वितरीत करीत आहे.

  लाखो लोक या व्हायरसशी लढत असताना अगदी अनपेक्षित ठिकाणांहूनही मदत मिळाली. श्रीमती जेमिनीबेन जोशी या गुजरातमधील 71 वर्षीय निवृत्त परिचारिकेने आघाडीच्या आरोग्य सेवकांचा कार्यभार खूपच वाढला होता आणि रुग्णांच्या तुलनेने त्यांची संख्या कमी होती. एक मुठी जोखीम स्वीकारून, त्यांनी एका रुग्णालयात पुन्हा एकदा एक नर्स म्हणून रुजू झाल्या आणि त्या औषधे व ऑक्सिजनचे व्यवस्थापन आणि चाचण्यांचे नमुने घेण्यामध्ये दररोजचे 12 तास व्यतीत करतात.

  सर्वांत वाईट परिस्थितीमध्ये, हजारो लोक मरण पावत होते. रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा होता आणि रुग्णांना बेड मिळवण्यासाठी स्वतःच ऑक्सिजनची करण्यास सांगितले जात होते. त्याच ठिकाणी बिहारमधील ‘ऑक्सिजन मॅन’ गौरव राय सारखे देवदूत होते. आपल्या साठवलेल्या 1.25 लाख रुपयांमधून त्याने ऑक्सिजन सिलिंडर्स खरेदी करून ते त्याच्या राज्यातील अत्यवस्थ रुग्णांना वितरीत केले. त्याचा फोन सतत खणखणत होता, पण त्याच्या आत्यंतिक गरज असलेल्या व्यक्तींना मदत करण्याच्या दृढनिश्चयाने ज्यांना मदतीचा अन्य कोणताही स्त्रोत उपलब्ध नाही अशा किमान 1500 अत्यवस्थ रुग्णांचा जीव वाचवला.

  आपल्यापैकी प्रत्येकाला बहुधा अशा अद्वितीय सत्यकथा माहिती आहेत. या उल्लेखनीय निःस्वार्थ सत्यकथा रेकॉर्ड करून त्या सर्वांपर्यंत पोहचवल्या पाहिजेत असे Lifelong Online ला वाटते. या सत्यकथा ऑनलाईन पद्धतीने एकत्रित करणे हा त्यांच्या सेवा आणि साहसाला अभिवादन करण्याचा आणि कृतज्ञता व्यक्त करण्याच एक उत्तम मार्ग आहे. हा संग्रह मानवतेच्या या प्रकरणामधील एक महत्त्वाचा भाग ठरू शकेल, आणि जेव्हा आपण हे पान उघडू तेव्हा ते वाचू शकू, आणि त्यांच्या सर्वोत्तम कामामधून प्रेरणा घेऊ शकू.

  जर अशा अज्ञात लोकांशी आपलीही गाठ पडली असेल की, ज्यांनी अशा कठीण प्रसंगी आपल्याला मदत केली तर, #NeverForgetLifelong या हॅशटॅगसह कोणत्याही सोशल मिडिया प्लॅटफॉर्म वर ते शेअर करा किंवा myhero@lifelongindia.com वर ते मेल करा.

  आम्ही या सत्यकथांमधील हजारो अज्ञात लोकांचे आभार मानतो ज्यांनी या देशाला आत्यंतिक गरजेच्या वेळी मदतीचा हात दिला.

  This article has been created by Studio18 on behalf of Lifelong Online

  First published:
  top videos