जाहिरात
मराठी बातम्या / बातम्या / 60 वर्ष काही करू न शकणारे 60 दिवसात हिशेब मागतायत-मोदी

60 वर्ष काही करू न शकणारे 60 दिवसात हिशेब मागतायत-मोदी

60 वर्ष काही करू न शकणारे 60 दिवसात हिशेब मागतायत-मोदी

****09 ऑगस्ट : जेव्हापासून मी पंतप्रधान झालोय तेव्हापासून माझा जास्त वेळ साफसफाईतच गेलाय. जे लोक 60 वर्षात काही करू शकले नाही ते आमच्याकडून 60 दिवसांचा हिशेब मागतायत अशी शेलक्या शब्दात भाजपचे नेते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर टीका केली. आज नवी दिल्लीत भाजपची राष्ट्रीय बैठक पार पडली. यावेळी ते बोलत होते. या बैठकीत अमित शाह यांनी भाजपच्या अध्यक्षपदाची सूत्रं हाती घेतली. लोकसभा निवडणुकीत राजनाथ सिंह कॅप्टन होते तर अमित शाह हे ‘मॅन ऑफ द मॅच’ ठरले असं कौतुकही मोदींनी केलं.

  • -MIN READ
  • Last Updated :

    narendra_modi_bjp_meet ****09 ऑगस्ट : जेव्हापासून मी पंतप्रधान झालोय तेव्हापासून माझा जास्त वेळ साफसफाईतच गेलाय. जे लोक 60 वर्षात काही करू शकले नाही ते आमच्याकडून 60 दिवसांचा हिशेब मागतायत अशी शेलक्या शब्दात भाजपचे नेते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर टीका केली. आज नवी दिल्लीत भाजपची राष्ट्रीय बैठक पार पडली. यावेळी ते बोलत होते. या बैठकीत अमित शाह यांनी भाजपच्या अध्यक्षपदाची सूत्रं हाती घेतली. लोकसभा निवडणुकीत राजनाथ सिंह कॅप्टन होते तर अमित शाह हे ‘मॅन ऑफ द मॅच’ ठरले असं कौतुकही मोदींनी केलं. या बैठकीत भाजपच्या नेत्यांनी काँग्रेसवर सडकून टीका केली.

    जाहिरात

    पंतप्रधानपदावर विराजमान झाल्यानंतर पहिल्यांदाच नरेंद्र मोदी भाजपच्या कार्यक्रमाला हजर राहिले. यावेळी त्यांनी लोकसभेत झालेल्या विजयाबद्दल जनतेचे पुन्हा आभार मानले. देशातील 125 करोड जनतेनं आमच्यावर विश्वास दाखवला आहे. त्यामुळे त्यांच्या आशा आकांक्षा आम्ही पूर्ण करू अशी ग्वाही मोदींनी दिली. लोकसभा निवडणूक राजकीय पंडितांसाठी जरा कठीणच गेली. यातील बर्‍याच जणांनी सांगितले होतं की, गुजरातच्या बाहेर मोंदीना कोण ओळखतं पण जनतेनं आपला कौल देऊन राजकीय पंडितांना सडेतोड उत्तर दिलंय असा टोलाही मोदींनी लगावला. यानंतर मोदींनी राजनाथ सिंह आणि आपले निकटवर्तीय अमित शाह यांच्यावर स्तुतीसुमनं उधळली. मला विश्वास आहे की अमित शाह यांच्या नेतृत्वाखाली भाजप आणखी यश मिळवेल. लोकसभा निवडणुकीतील राजनाथ सिंह कॅप्टन होते तर ‘मॅन ऑफ द मॅच’ अमित शाह होते अशी कौतुकाने पाठही मोदींनी थोपाटली. तसंच लोकसभा निवडणूक जिंकल्यानंतर जगाचा भारताकडे बघण्याचा दृष्टिकोन बदललाय. जगातील अनेक देश आता भारताशी मैत्रीचे आणि व्यापारी संबंध वाढवण्यास उत्सुक आहेत. मी खात्रीपूर्वक सांगतो जगात भारताचं नाव गाजणार आहे. पण इतका मोठा देश एकटा पंतप्रधान चालवू शकत नाही. यासाठी मला तुम्हा सर्वांची साथ हवीये. प्रत्येक पोलिंग बूथ वर 100 पीएम हवेत. पीएम म्हणजे पोलिंग मेंबर असणार आहे. पक्षाने दरवर्षी एक मुद्दा घेऊन जनतेसमोर जावं जनतेच्या हिताचं, जनजागरण करण्याचं काम हे वर्षभरात होईल असा व्यापक विचार पार्टीने करावा असा सल्लाही मोदींनी दिला. महाराष्ट्रात भाजपचंच सरकार येणार -शाह मोदींच्या भाषणाच्या अगोदर अमित शाह, लालकृष्ण अडवाणी यांची भाषणं झाली. या परिषदेत बोलताना अध्यक्ष अमित शाहांनी काँग्रेसवर हल्लाबोल केलाय. जनतेने काँग्रेसला नाकारलं असून, विरोधी पक्षाचंही स्थान त्यांना दिलेलं नाही अशा शब्दांत अमित शहांनी काँग्रेसवर टीका केलीय. सोबतच विधानसभा निवडणुकांसाठीची रणनीही अमित शाहांनी स्पष्ट केलीय. येणार्‍या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपच्या नेतृत्वाखाली सत्ता येईल असा विश्वासही शाह यांनी व्यक्त केला. +++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

    बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

    Follow @ibnlokmattv // <![CDATA[ !function(d,s,id){var js,fjs=d.getElementsByTagName(s)[0],p=/^http:/.test(d.location)?‘http’:‘https’;if(!d.getElementById(id)){js=d.createElement(s);js.id=id;js.src=p+’://platform.twitter.com/widgets.js’;fjs.parentNode.insertBefore(js,fjs);}}(document, ‘script’, ’twitter-wjs’); // ]]>

    +++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात