ख्रिसमस साठी साजतीय बाजारपेठ, या ठिकाणी करा खरेदी..
साईप्रसाद महेंद्रकर / प्रतिनिधी
15 डिसेंबर, कोल्हापूर : ख्रिस्ती बांधवांसाठी एक महत्त्वाचा आणि पवित्र सण म्हणजे नाताळ. प्रभू येशू ख्रिस्तांचा जन्मदिवस मोठा आनंदात आणि उत्साहात सर्वत्र साजरा होत असतो. कोल्हापुरातही ख्रिस्ती बांधवांकडून दरवर्षी जल्लोषात नाताळ किंवा ख्रिसमस साजरा केला जातो त्यामुळेच यंदाच्या नाताळ सणासाठी कोल्हापुरातील बाजारपेठा सजल्या आहेत. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत लागणाऱ्या सर्वच गोष्टी आता दुकानात उपलब्ध झाले आहेत. कोल्हापुरातील पानलाइन म्हणून ओळख असणाऱ्या पापाची तिकटी ते कोल्हापूर महानगरपालिका इमारत या रोडवर अशी अनेक दुकाने आहेत.
कोणत्याही सणासाठी लागणाऱ्या सर्व गोष्टी मिळण्याचे कोल्हापूर शहरातील एक महत्वाचे ठिकाण म्हणजे पानलाईन. या ठिकाणी अनेक दुकाने आहेत जी गणेशोत्सव, दिवाळी यासह प्रत्येक धर्माच्या सणावेळी लागणाऱ्या साहित्यांची विक्री करत असतात. त्यामुळेच आता ख्रिस्ती बांधवांच्या ख्रिसमस किंवा नाताळसाठी देखील अनेक वस्तू या ठिकाणी मिळू लागल्या आहेत. यातच मुन्ना तांबोळी यांचेही एक दुकान आहे. गेल्या 40 वर्षांप्रमाणेच दरवर्षीप्रमाणे यंदाही त्यांच्या दुकानात नाताळच्या सजावटीपासून सण साजरा करण्यासाठीच्या सर्व गोष्टी उपलब्ध आहेत.
काय काय आहेत या वस्तू..
तांबोळी यांच्या दुकानामध्ये नाताळ सणासाठी आवश्यक वस्तूंची रेलचेल पाहायला मिळत आहे. यामध्ये ख्रिसमस ट्री, होली रिट, बेल्स, स्टार्स, प्रभू येशू आणि मेरीच्या सुंदर मूर्ती, देखावे, सांता क्लॉजचे मुखवटे, चांदणी, खेळणी, लहान मुलांचे कपडे, सांता क्लॉजचे छोटे किचेन, लहान मुलांचे सांता क्लॉजचे ड्रेस, टोप्या गव्हाणे आणि फॅन्सी कटाऊटस, सांता क्लॉज हेअर बेल्ट, गॉगल्स तसेच सजावटीसाठी विविध गोष्टी आदी वस्तूंची खरेदी करण्यासाठी आता गर्दी होऊ लागली आहे.
किती रुपये आहेत यांची किंमत?
तांबोळी यांच्या दुकानात छोटे ख्रिसमस ट्री 20 रुपयांपासून ते 3000 रुपयांपर्यंत, सांता क्लॉज हे 60 पासून 8000 रुपयांपर्यंत, सांता क्लॉजच्या टोप्या 20 रुपयांपासून ते 40 रुपयांपर्यंत, लहान मुलांचे ड्रेस 200 रुपयांपासून ते 2000 रुपयांपर्यंत, सांता क्लॉजचे मुखवटे 100 रुपयांपासून ते 250 रुपयांपर्यंत, बेल्स 60 रुपयांपासून, मेरी ख्रिसमस 3D बॅनर 50 रुपयांपासून 200 रुपयांपर्यंत, स्टीक्स 60 रुपयांपासून 250 रुपयांपर्यंत विक्रीसाठी उपलब्ध आहेत. तर यंदा लहान मुलांचे सांता क्लॉजच्या कपड्यांना व सजावटीच्या साहित्याला विशेष मागणी असल्याचे तांबोळी यांनी सांगितले आहे.
दरम्यान अशाच प्रकारच्या अनेक वस्तू कोल्हापुरातील महाद्वार रोड बाजार गेट राजारामपुरी या भागात देखील विक्रीसाठी उपलब्ध आहेत. तर या सर्व गोष्टी खरेदी करून यंदाचा नाताळ सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यासाठी कोल्हापुरातील ख्रिश्चन धर्मीय बाजारपेठेत गर्दी करत आहेत.
संपर्क (मुन्ना तांबोळी) :
083296 72782
पत्ता :
मुन्ना पतंग डेपो, पानलाईन, शुक्रवार पेठ, कोल्हापूर - 416002
गुगल मॅप लिंक:
https://maps.app.goo.gl/3chSn2vLrMn9E5ip9