S M L

काश्मीरमधल्या कुलगाममध्ये 3 दहशतवादी ठार, DSP शहीद

कुलगाम येथे लष्करानं 3 दहशतवाद्यांना ठार केलं आहे. तर, यामध्ये काश्मीर पोलिसांचे डीएसपी अमन ठाकूर शहीद झाले आहेत.

Updated On: Feb 24, 2019 05:22 PM IST

काश्मीरमधल्या कुलगाममध्ये 3 दहशतवादी ठार, DSP शहीद

कुलगाम, 24 फेब्रुवारी : पुलवामा हल्ल्यानंतर लष्करानं दहशतवाद्यांचा खात्मा करायला सुरूवात केली आहे. सध्या कुलगाम येथे लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. यामध्ये तीन दहशतवाद्यांना ठार करण्यामध्ये लष्कराला यश आलं आहे. तर, कारवाईमध्ये डीएसपी अमन ठाकूर शहीद झाले असून लष्कराचा मेजर,  2 जवान आणि 2 नागरिक जखमी झाले आहेत.

पुलवामा येथील दहशतवाद्यांच्या आत्मघातकी हल्ल्यामध्ये 40 जवान शहीद झाले होते. त्यानंतर आता लष्करानं दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी कडक पावलं उचलली आहे. यापूर्वी पुलवामा येथे झालेल्या कारवाईमध्ये देखील दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता. त्यावेळी 4 जवान शहीद झाले होते. काश्मीरमधील परिस्थिती दिवसेंदिवस तणावाची होताना दिसत आहे.

शनिवारी फुटरतावाद्यांना अटक करण्यात आली असून निमलष्करी दलाच्या 100 तुकड्या देखील काश्मीरमध्ये तैनात करण्यात आल्या आहेत.


दोन दहशतवाद्यांमागे एक जवान होतोय शहीद

लवामा हल्ल्यानंतर जम्मू आणि काश्मीरमधली परिस्थिती आणखी चिघळली आहे. गेल्या चार वर्षात राज्यातली परिस्थिती सर्वाधिक खराब असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे. केंद्र सरकारने परिस्थिती पूर्वपदावर यावी यासाठी अनेक उपाययोजना केल्यात मात्र त्याचा फायदा झाला नाही. गेल्या काही वर्षात पहिल्यांदाच राज्यपालपदावर राजकीय व्यक्तिची निवड केली गेली मात्र त्याचाही काही उपयोग झाला नाही असच दिसून येतं आहे.

लष्कराने दहशतवाद्यांविरुद्ध 'ऑपरेशन ऑल आऊट' ही मोहिम राबवली आणि मोठ्या प्रमाणावर दहशतवाद्यांना ठार मारण्यात यश मिळवलं असा दावा केला. मात्र या करावाईमध्ये लष्करी जावनही मोठ्या प्रमाणावर शहीद झाले ही वस्तुस्थिती आहे. दोन अतिरेक्यांचा खात्मा करताना एका जवानाला वीर मरण पत्करावं लागलं.

Loading...

साउथ आशिया टेरेरिझम पोर्टल (SATP) ही संस्था दहशतवादाचा अभ्यास करणारी संस्था आहे. या संस्थेकडे जी आकडेवारी आहे त्यानुसार जम्मू आणि काश्मीरमधली स्थिती सर्वाधिक हिंसक झाल्याचं म्हटलं आहे.

धक्कादायक आकडेवारी

2018 मध्ये छोटे आणि मोठे 205 हल्ले झाले होते. तर 2017 मध्ये हिंसाचाराच्या एकूण 164, 2016 मध्ये 112, 2015 मध्ये 88 आणि 2014 मध्ये 90 घटना घडल्या होत्या. 2019 च्या दोन महिन्यांमध्ये दहशवादी हल्ल्याच्या 16 घटना घडल्या होत्या.

News18 ने जेव्हा या सगळ्या घटना आणि आकडेवारीचा अभ्यास केल्यानंतर असं लक्षात आलं की 2 अतिरेक्यांच्या खात्मा करताना एका जवानाला शहीद व्हावं लागलं. तर 82 अतिरेक्यांमागे 18 स्थानिक नागरिक ठार झाले. नोव्हेंबर महिन्यात सुरक्षा दलांनी 107 तर डिसेंबर महिन्यात 105 अतिरेकी ठार केले.

लष्कराचं नुकसान

2014 ते फेब्रुवारी 2019 या पाच वर्षात अतिरेक्यांच्या हल्ल्यात 381 जवानांना वीर मरण आलं. सर्वात जास्त दहशतवादी हल्ले हे 2018 मध्ये घडल्याचं स्पष्ट झालं. 2018 मध्ये दहशतवदी हल्ल्यात 91 सैनिकांना प्राण गमवावे लागले. तर 38 नागरिकांना प्राण गमवावे लागाले. या आकडेवारीवरून 2018 मध्ये सर्वात जास्त अतिरेकी ठार झाले असले तरी जवान, नागरिकांनाही मोठ्या प्रमाणावर प्राण गमवावे लागले.

2014 ते 2018 दरम्यान सामान्य नागरिकांच्या मृत्यूत 35.71 टक्के वाढ झाली. तर 2014 ते 2018 दरम्यान 134 टक्के जास्त दहशतवादी मारले गेले.

भारतीय लष्कराने 2014 मध्ये 110 अतिरेक्यांना ठार केलं. 2018 मध्ये ही संख्या वाढून 257 झाली. या पाच वर्षात 838 अतिरेक्यांचा खात्मा करण्यात लष्कराला यश आलं. तर 2014 ते 2018 या काळात जम्मू-कश्मीरमध्ये एकूण 1315 जणांचा मृत्यू झाला. त्यात 138 (10.49%) नागरिक, 339 (25%) जवान आणि 838 (63.72%) अतिरेकी होते.

VIDEO: 'शहीद जवानांचा राजकीय बळी, अजित डोवालांची चौकशी करा'

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 24, 2019 05:06 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close