16 सप्टेंबर : मुंबईतील प्रसिद्ध लालबागच्या राजाचं तब्बल 21 तासांच्या मिरवणुकीनंतर आज (शुक्रवारी) सकाळी 7.30 च्या सुमारास अरबी समुद्रात विसर्जन करण्यात आलं. वर्षभर आपल्या लाडक्या बाप्पाची आतुर्तेने वाट पाहणाऱ्या भाविकांनी अतिशय जड मनाने निरोप दिला.
काल (गुरूवारी) सकाळी 10.30च्या सुमारास लालबागचा राजा मंडपातून निघाला होता. त्यानंतर तब्बल 22 तासांच्या मिरवणुकीनंतर लालबागचा राजा गिरगाव चौपाटीवर दाखल झाला. यंदा लालबागचा राजा नेहमीपेक्षा लवकर चौपाटीवर दाखल झाला. राजाच्या विसर्जनासाठीलालबागच्या राजाच्या विसर्जनासाठी यंदा मरीन टेक्नोलॉजीचा वापर करण्यात आला. मात्र, समुद्राला ओहोटी असल्यामुळे लालबागच्या राजाचं विसर्जन काही काळ लांबले.
दरम्यान, लालबागच्या राजाला निरोप देण्यासाठी गिरगाव चौपाटीवर भाविकांची मोठी गर्दी जमली होती. लालबागच्या राजाची आरती करून राजाची मूर्ती विशेष तराफ्यावर बसवण्यात आली, त्यानंतर कोळीबांधवांकडून हा तराफा समुद्रात खेचून नेण्यात आला.
लालबागच्या राजाच्या विसर्जनासाठी यंदा मरीन टेक्नोलॉजीचा
लालबागच्या राजाच्या विसर्जनासाठी यंदा मरीन टेक्नोलॉजीचा वापर करण्यात आला आहे. लालबागच्या राजाचे विसर्जन यापुढे शास्त्रोक्त पद्धतीने करण्यात येणार आहे. त्यासाठी विशेष तराफा तयार करण्यात आला आहे. लिफ्ट पद्धतीचा तराफा तयार करण्यात आला आहे. शार्प शिपयार्ड कंपनीनं हा विशेष तराफा तयार केला आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bappa morya re, गणपती बाप्पा, गणेशोत्सव, बाप्पा, बाप्पा मोरया रे