दारू पिऊन गाडी चालविल्याने 14000 अपघात; महाराष्ट्राचा आकडा वाचून बसेल धक्का

दारू पिऊन गाडी चालविल्याने 14000 अपघात; महाराष्ट्राचा आकडा वाचून बसेल धक्का

कडक नियम करूनही लोक ड्रिंक अॅण्ड ड्राइव्ह करता दिसतात, यातून झालेल्या अपघातात अनेकांचा जीवही गेला आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 17 सप्टेंबर :  दारू (Liquor) वा कोणत्याही अमली पदार्थांची नशा करून वाहन चालविणे धोकादायक असू शकतं. (Drink and Drive) याबाबत लोकांमध्ये जागृकता निर्माण करण्यासाठी सरकार दरवर्षी कोटी रुपये खर्च करते. मात्र अशा प्रकारे नियमांचे उल्लंघन केल्यास दंड आणि शिक्षाही दिली जाते. मात्र यानंतर देशात मोठ्या प्रमाणात ड्रिंक अॅण्ड ड्राइव्हची प्रकरणं समोर येत आहेत. देशात दरवर्षी 14000 हून जास्त रस्ते अपघात दारू पिऊन गाडी चालविल्याने होत असल्याची माहिती समोर आली आहे.

मात्र या आकडेवारीत विशेष बाब म्हणजे ज्या शहरांमध्ये वाहनांची संख्या जास्त आहे तेथे दारू पिऊन गाडी चालविण्याचे प्रमाण अत्यंत कमी आहे. दुसरीकडे देशात दरवर्षी दारू पिऊन गाडी चालविण्याचे प्रमाण जास्त आहे.

पहिला क्रमांक उत्तर प्रदेशचा त्यानंतर ओडिशा आणि आंध्रप्रदेश

दारू वा दुसऱ्या प्रकारचा नशा करून गाडी चालवून अपघात करणाऱ्यांमध्ये गेल्या 3 वर्षात उत्तर प्रदेशातील लोक पहिल्या क्रमांकावर आहे. तीन वर्षांपासून सातत्याने उत्तर प्रदेशात हा आकडा 3000 हून अधिक आहे. 2019 मध्ये ही संख्या 4500 जवळ पोहोचली होती. तीन वर्षात युपीमध्ये 11.5 हजारांहून अधिक अपघात झाले आहेत. ओडिशाबद्दल सांगायचे झाल्यास येथे गेल्या 3 वर्षांत तब्बल 4000 अपघात केवळ दारू पिऊन गाडी चालविल्यामुळे झाले आहेत.

दिल्ली-महाराष्ट्राची संख्या वाचून बसेल धक्का

मेट्रो सिटीबद्दल बोलायचे झाल्यास दिल्ली आणि मुंबईतील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात गाड्या धावत असतात. मात्र येथे दारू पिऊन गाडी चालविणे आणि अपघात करण्यांची संख्या अत्यंत कमी आहे. दिल्लीत 3 वर्षांत केवळ 675 केस दारू पिऊन अपघात केल्याच्या घटना समोर आल्या आहेत. तर महाराष्ट्रात ही संख्या 1350 इतकी आहे. या शहरांमधील रेलचेल पाहता येथे दारू पिऊन गाडी चालविणे आणि अपघात करणाऱ्यांची संख्या जास्त असेल असं वाटतं असलं तरी येथील परिस्थिती वेगळी आहे.

Published by: Meenal Gangurde
First published: September 17, 2020, 6:32 PM IST

ताज्या बातम्या