05 जुलै : 13 जुलै 2011 रोजी मुंबईत झालेल्या तीन साखळी बॉम्बस्फोटात आपला हात होता असं इंडियन मुजाहिद्दीनचा संशयित सह-संस्थापक यासिन भटकळ यांनं कबूल केलंय.
मी या स्फोटावर समाधानी आहे आण मला अभिमान आहे की, मी हे स्फोट घडवून आणले, असं भटकळ यांनं महाराष्ट्र एटीएसला सांगितलंय.
त्याला या स्फोटांचा कुठलाही पश्चाताप झालेला नाही. 13 जुलै 2011 रोजी मुंबईतील झवेरी बाजार, ऑपेरा हाऊस, आणि दादर येथे कबुतरखाना इथं स्फोट झाले होते. या स्फोटात 26 जण ठार झाले होते. या स्फोट प्रकरणी भटकळवर मोक्का अंतर्गत आरोप ठेवण्यात आले आहे.
सध्या भटकळ मुंबई पोलिसांच्या ताब्यात आहे. आज पोलिसांच्या चौकशी दरम्यान भटकळ याने स्फोट घडवून आणल्याचं कबूल केलंच पण या कृत्याचा आपल्याला अभिमान असल्याचंही बडबड केली.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्र अकाऊंटसोबत
Follow @ibnlokmattv // <![CDATA[ !function(d,s,id){var js,fjs=d.getElementsByTagName(s)[0],p=/^http:/.test(d.location)?‘http’:‘https’;if(!d.getElementById(id)){js=d.createElement(s);js.id=id;js.src=p+’://platform.twitter.com/widgets.js’;fjs.parentNode.insertBefore(js,fjs);}}(document, ‘script’, ’twitter-wjs’); // ]]> |
---|
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++