बहादुरगढ, 6 डिसेंबर : देशात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. बलात्काराच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. देशाताली श्रद्धा वालकर हत्या प्रकरण ताजे असतानाच आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका 13 वर्षीय मुलीवर बलात्कार झाल्याची घटना घडली. पीडित तरुणी गर्भवती झाल्यानंतर परिवारांत मोठी खळबळ उडाली.
काय आहे संपूर्ण प्रकरण -
हरियाणातील बहादूरगडमध्ये एका 13 वर्षीय निष्पाप मुलीवर बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. मुलीच्या पोटात दुखू लागल्याने तिला उपचारासाठी डॉक्टरांकडे नेले असता मुलीवर बलात्कार झाल्याची माहिती नातेवाईकांना मिळाली. यावेळी मुलगी गरोदर असल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने कुटुंबीयांच्या पायाखालची जमीनच सरकली. तर मुलीला विचारले असता, शेजारच्या 50 वर्षीय व्यक्तीने तिच्यावर बलात्कार केल्याची कबुली तिने दिली.
13 वर्षांची निष्पाप मुलगी तिच्या आईसोबत अनेकदा आरोपीच्या घराची साफसफाई करायला जात असे. एक दिवस ती आरोपीच्या घरी कामानिमित्त एकटी गेली, त्याच दिवशी आरोपीने तिला आपल्या वासनेची शिकार बनवले. तर कुटुंबीयांच्या तक्रारीच्या आधारे आरोपीला महिला पोलिसांनी अटक केली आहे.
हेही वाचा - लग्नाच्या सहा महिन्यातच तरुणी बॉयफ्रेंडसोबत फरार; म्हणाली, पुस्तक देऊन येते अन्...
महिला स्टेशन प्रभारी राजेश कुमारी यांनी सांगितले की, तक्रारीच्या आधारे त्यांनी आरोपीला अटक केली आहे. आरोपीची वैद्यकीय तपासणीही करण्यात आली असून त्याला आजच न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. मात्र, आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. 13 वर्षीय मुलीवर बलात्कार करुन ती गर्भवती राहिल्याच्या या घटनेनंतर मोठी खळबळ उडाली आहे. पोलीस याप्रकरणी पुढील तपास करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Haryana, Rape, Rape on minor