लखेश्वर यादव, प्रतिनिधी जांजगीर चांपा, 11 जून : छत्तीसगड जिल्ह्याच्या जांजगीर चांपा जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. चंपा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका 12 वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू झाला. ऋतुराज देवांगन असे मुलाचे नाव आहे. तो कुटुंबासह बंधाऱ्यात आंघोळीसाठी गेला होता. कुद्री गावात हसदेव नदीच्या बंधाऱ्यात हा अपघात झाला. ऋतुराज दिवांगन अंघोळ करताना खोल पाण्यात गेल्याने त्याचा मृत्यू झाला असे सांगण्यात आले आहे. चांपा पोलीस स्टेशनचे हेड कॉन्स्टेबल प्रकाश राठोड यांनी दिलेल्या माहितीनुसार, संजय नगर चांपा येथील रहिवासी अनिल दिवांगन आणि ऋतुराज दिवांगन त्याची आई आणि लहान बहिणीसह कुद्री गावातील हसदेव नदीत बांधलेल्या बंधाऱ्यावर अंघोळीसाठी गेले होते. अनिल दिवांगन हे कपडे बनवण्याचे काम करतात.
ते कुटुंबासह आंघोळीसाठी गेले होते. यादरम्यान 12 वर्षीय ऋतुराज दिवांगण हा ट्युबमध्ये बसून अंघोळ करत होता. आई-वडील आणि लहान मुलगीही जवळच अंघोळ करत होती. त्यानंतर अंघोळ करताना ऋतुराजची ट्यूब उलटली आणि तो हसदेव नदीच्या पाण्यात बुडाला. मुलगा बुडत असल्याचे पाहून वडील अनिल दिवांग त्याला वाचवण्यासाठी गेले. मात्र, तोपर्यंत उशीर झाला होता आणि तो खोल पाण्यात गेला. घटनास्थळी आंघोळ करणाऱ्या तरुणांनी तत्काळ ऋतुराजचा शोध सुरू केला. अर्ध्या तासानंतर ऋतुराज खोल पाण्यात बुडालेला आढळून आला. त्याला तातडीने बीडीएम रुग्णालयात उपचारासाठी आणले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या अपघातानंतर कुटुंबीयांने दु:खाचा डोंगर कोसळला आहे. मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे. मृत ऋतुराज दिवांगनचे वडील अनिल दिवांगन यांनी सांगितले की, ऋतुराज त्यांच्या दोन मुलांमध्ये मोठा होता. तो अभ्यासात खूप हुशार होता. तो नुकताच सहावी पास झाला होता आणि सातवीत प्रवेश करणार होता.