जाहिरात
मराठी बातम्या / बातम्या / हिंदू वस्त्यांमध्ये मालमत्ता घेणार्‍या मुस्लिमांना बाहेर काढा -तोगडिया

हिंदू वस्त्यांमध्ये मालमत्ता घेणार्‍या मुस्लिमांना बाहेर काढा -तोगडिया

हिंदू वस्त्यांमध्ये मालमत्ता घेणार्‍या मुस्लिमांना बाहेर काढा -तोगडिया

21 एप्रिल : विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष प्रवीण तोगडिया यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलंय. राजकोटमध्ये हिंदू बहुल वस्त्यांमध्ये मालमत्ता घेणार्‍या मुस्लिमांना बाहेर काढा. हिंदू भागात मुस्लिमांना मालमत्ता घेता येणार नाही, असा कायदा बनवण्यासाठी सरकारवर दबाव आणा. जर असं घडलं तर अशा मालमत्तांचा ताबा मिळवा आणि त्यावर बजरंग दलाचा बोर्ड लावा. यासाठी आम्ही कोर्टात लढू असं विधान तोगडियांनी केलंय. जाहिरात राजकोटमध्ये एका मुस्लिम उद्योजकाने घेतलेल्या घराबाहेर करण्यात आलेल्या निदर्शनांमध्ये तोगडिया सहभागी झाले.

  • -MIN READ
  • Last Updated :

    34prveen_togadia_news 21 एप्रिल : विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष प्रवीण तोगडिया यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलंय. राजकोटमध्ये हिंदू बहुल वस्त्यांमध्ये मालमत्ता घेणार्‍या मुस्लिमांना बाहेर काढा. हिंदू भागात मुस्लिमांना मालमत्ता घेता येणार नाही, असा कायदा बनवण्यासाठी सरकारवर दबाव आणा. जर असं घडलं तर अशा मालमत्तांचा ताबा मिळवा आणि त्यावर बजरंग दलाचा बोर्ड लावा. यासाठी आम्ही कोर्टात लढू असं विधान तोगडियांनी केलंय.

    जाहिरात

    राजकोटमध्ये एका मुस्लिम उद्योजकाने घेतलेल्या घराबाहेर करण्यात आलेल्या निदर्शनांमध्ये तोगडिया सहभागी झाले. या घराचा ताबा घेऊन त्यावर बजरंग दलाचा फलक लावण्याचे आदेश तोगडियांनी निदर्शकांना दिल्याचं सांगण्यात येतंय. हे घर सोडण्यासाठी त्यांनी इथं राहणार्‍या मुस्लिम उद्योजकाला 48 तासांची मुदत दिलीय.

    मात्र, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने तोगडियांची पाठराखण केलीय. तोगडियांना आरोपीच्या पिंजर्‍यात उभं करावं असं कोणतंही वक्तव्य केलेलं नाही. संघाचा कोणताही स्वयंसेवक अशा प्रकारे विचार करत नाही. ही बातमी फेरफार करून सांगितली असल्याचं संघाचे प्रवक्ते राम माधव यांनी म्हटलंय. तर काँग्रेस नेते राशीद अल्वी यांनी तोगडिंयाच्या या वक्तव्यावर टीका केलीय आणि त्यांच्यावर कारवाई व्हावी, अशी मागणी केलीय.

    +++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++ बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

    Follow @ibnlokmattv // <![CDATA[ !function(d,s,id){var js,fjs=d.getElementsByTagName(s)[0],p=/^http:/.test(d.location)?‘http’:‘https’;if(!d.getElementById(id)){js=d.createElement(s);js.id=id;js.src=p+’://platform.twitter.com/widgets.js’;fjs.parentNode.insertBefore(js,fjs);}}(document, ‘script’, ’twitter-wjs’); // ]]>

    +++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    Tags: RSS , sangha , VHP
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात