जाहिरात
मराठी बातम्या / बातम्या / सूरज पांचोलीनेच केला जियाचा गर्भपात

सूरज पांचोलीनेच केला जियाचा गर्भपात

सूरज पांचोलीनेच केला जियाचा गर्भपात

11 डिसेंबर : अभिनेत्री जिया खान प्रकरणाला नवं वळण लागलंय. 2013 साली आत्महत्या करण्यापूर्वी जियाचा गर्भपात करण्यात आला होता अशी माहिती सीबीआयतर्फे न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या आरोपपत्रातून मिळाली आहे. प्रियकर सूरज पांचोलीनेच तिला गर्भपाताची गोळी दिली होती. त्यानंतर सूरजने स्वतःच डॉक्टरची वाट न पहाता तिचं भ्रूण काढून टॉयलेटमध्ये फेकलं असल्याची धक्कादायक माहिती सीबीआयच्या या आरोपपत्रातून समोर आलीये. जाहिरात जियाला मूल झालं तर त्याचा थेट परिणाम आपल्या करिअरवर होऊ शकतो. त्यामुळेच त्याने तिचं मूल संपवलं.

  • -MIN READ
  • Last Updated :

    suraj pancholi4 11 डिसेंबर : अभिनेत्री जिया खान प्रकरणाला नवं वळण लागलंय. 2013 साली आत्महत्या करण्यापूर्वी जियाचा गर्भपात करण्यात आला होता अशी माहिती सीबीआयतर्फे न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या आरोपपत्रातून मिळाली आहे. प्रियकर सूरज पांचोलीनेच तिला गर्भपाताची गोळी दिली होती. त्यानंतर सूरजने स्वतःच डॉक्टरची वाट न पहाता तिचं भ्रूण काढून टॉयलेटमध्ये फेकलं असल्याची धक्कादायक माहिती सीबीआयच्या या आरोपपत्रातून समोर आलीये.

    जाहिरात

    जियाला मूल झालं तर त्याचा थेट परिणाम आपल्या करिअरवर होऊ शकतो. त्यामुळेच त्याने तिचं मूल संपवलं. त्याचाच परिणाम तिच्या मनावर झाल्यामुळे ती आत्महत्येसाठी प्रवृत्त झाल्याचं सीबीआयचं म्हणणं आहे. 2013 साली जियाने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्यानंतर तिच्या आईने सूरज पांचोली विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. तसंच हे प्रकरण सीबीआयकडे वर्ग करण्याची मागणी केली. त्यानुसार सीबीआयने या प्रकरणाचा तपास पूर्ण करून सूरज विरोधात आपलं आरोपपत्र कोर्टात दाखल केलंय. त्यातूनच ही धक्कादायक माहिती समोर आलीय.

    ++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

    बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

    Follow @ibnlokmattv // <![CDATA[ !function(d,s,id){var js,fjs=d.getElementsByTagName(s)[0],p=/^http:/.test(d.location)?‘http’:‘https’;if(!d.getElementById(id)){js=d.createElement(s);js.id=id;js.src=p+’://platform.twitter.com/widgets.js’;fjs.parentNode.insertBefore(js,fjs);}}(document, ‘script’, ’twitter-wjs’); // ]]>

    +++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात