08 जून : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस)चे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांना ‘झेड प्लस’ सुरक्षा देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.
अधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार, भागवत यांचं नाव दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर आल्याने त्यांना ही सुरक्षा देण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला आहे. झेड प्लस सुरक्षेत सीआयएसएफचे कमांडो असणार आहेत.
सध्या भागवत यांच्या संरक्षणाची जबाबदारी राज्य पोलीस आणि राखीव पोलिस दलाकडे आहे. आता त्यांच्या सुरक्षेसाठी 60 कमांडो तैनात केले जाणार आहेत. राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांना देण्यात येणारी ही सुरक्षा आता भागवत यांना मिळणार आहे. त्यामुळे आता भागवत यांच्या सभोवती 24 तास 60 कमांडोचे कवच पाहायला मिळणार आहे.
10 जूनपासून भागवत यांना हे सुरक्षा कवच मिळणार आहे. भागवत हे देशभरात कुठेही दौर्यावर असताना त्यांच्यासोबत ही सुरक्षा असणार आहे.
++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्र अकाऊंटसोबत
Follow @ibnlokmattv // <![CDATA[ !function(d,s,id){var js,fjs=d.getElementsByTagName(s)[0],p=/^http:/.test(d.location)?‘http’:‘https’;if(!d.getElementById(id)){js=d.createElement(s);js.id=id;js.src=p+’://platform.twitter.com/widgets.js’;fjs.parentNode.insertBefore(js,fjs);}}(document, ‘script’, ’twitter-wjs’); // ]]> |
---|
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++