05 जून : पंतप्रधान नरेंद्र मोदी सप्टेंबरमध्ये अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांची भेट घेणार आहेत. संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेच्या बैठकीमध्ये सहभागी होण्यासाठी मोदी अमेरिकेला जाणार आहेत. यावेळी ओबामा यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करण्याचं आमंत्रण मोदी यांनी स्वीकारलं आहे. त्यासाठी दोन्ही बाजूंनी तारखा निश्चित करण्यात येत आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यामंत्री असताना अमेरिकेने त्यांना व्हिसा नाकारला होता. मात्र आता मोदी पंतप्रधानपदावर विराजमान होताच अमेरिकेची मोदींविषयीच्या भूमिका बदलली आहे. मोदींनी पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी मोदींना शुभेच्छा दिल्या होत्या. या संभाषणादरम्यान त्यांनी मोदींना अमेरिकेत येण्याचे निमंत्रणही दिले होते. मोदींनी हे निमंत्रण स्वीकारले असून सप्टेंबरमध्ये मोदी अमेरिकेला जाणार आहेत.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्र अकाऊंटसोबत
Follow @ibnlokmattv // <![CDATA[ !function(d,s,id){var js,fjs=d.getElementsByTagName(s)[0],p=/^http:/.test(d.location)?‘http’:‘https’;if(!d.getElementById(id)){js=d.createElement(s);js.id=id;js.src=p+’://platform.twitter.com/widgets.js’;fjs.parentNode.insertBefore(js,fjs);}}(document, ‘script’, ’twitter-wjs’); // ]]> |
---|
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++